सत्तरी ओलांडली पण नाही मिळालं बाप होण्याचं सुख, दुसऱ्या बायकोबद्दल काय म्हणाला प्रसिद्ध अभिनेता?
Bollywood Actor: 'बाप नाही झालो याची खंत...', सत्तरी ओलांडली पण अभिनेत्याला नाही मिळाला बाप होण्याचं सुख, दुसऱ्या बायकोबद्दल अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, खंत व्यक्त करत म्हणाला..., सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या वक्तव्याची चर्चा...

Bollywood Actor: बाप होणं प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असतो. पण प्रत्येकाला हे सुख आणि आनंद अनुभवता येत नाही. असंच काही बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यासोबत झालं आहे. सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेते अनुपम खेर आहेत. वयाच्या सत्तरीत देखील अनुपम खेर यांना बाप होण्याचं सुख अनुभवता आलं नाही. अनुपम खेर आणि किरण खेर यांनी 1985 मध्ये लग्न केलं.
किरण खेर यांचं पहिलं लग्न गौतम बैरी सोबत झालं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. किरण आणि गौतम यांना एक मुलगा देखील आहे. त्यांच्या मुलाचं नाव सिकंदर असं आहे. तर अनुपम खेर यांचं देखील किरण यांच्यासोबत दुसरं लग्न आहे.
सांगायचं झालं तर, अनुपम खेर आणि किरण खेर यांच्या लग्नाला 40 वर्ष झाली आहेत. पण त्यांना स्वतःचं मुल झालं नाही. आता अनुपम खेर यांना वाटकं की आपलं स्वतःचं एक मुल असायला हवं. एवढंच नाही तर, किरण राव यांना दुसऱ्यांदा मुल का नव्हतं होऊ शकत याचं कारण देखील अनुपम खेर यांनी नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सांगितलं.
अनुपम खेर म्हणाले, किरण कंसीव करू शकले नाहीत म्हणून त्याचं आणि किरण यांचं बाळ जगात आलं नाही. स्वतःच्या डोळ्यासमोर एका बाळाला मोठं होताना पाहिलं नाही म्हणजे आयुष्यात काहीतरी गमावल्यासारखं वाटतं… अनुपम खेर यांना विचारण्यात आलं. अनुपम खेर म्हणाले, ‘पूर्वी असं कधी वाटलं नाही. पण 60 व्या वर्षी असे विचार मनात येऊ लागले. मी मुलांसोबत प्रचंड काम केलं आहे.’
‘माझ्या फाउंडेशन देखील काम केलं आहे. मला लहान मुलं प्रचंड आवडतात. मी एक शो करायचो ‘से ना समथिंग टू अनुपम अंकल’ हा एक लहान मुलांचा शो होता.’ स्वतःच्या मुलांबद्दल अनुपम खेर म्हणाले, ‘किरण हिला कंसिव झालं होतं पण बाळाचा हवा तसा विकास झाला नव्हता आणि त्यानंतर आम्ही आमच्या कामात व्यस्त झालो… जेव्हा किरणसोबत माझं लग्न झालं तेव्हा मला काही मिसिंग वाटत नव्हतं…’ असं देखील अनुपम खेर म्हणाले.
एवढंच नाही तर, त्यांनी सावत्र मुलगा सिकंदर याच्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं. ‘असं नाही की सिकंदर आहे म्हणून मी आनंदी नाही. पण चांगलं वाटतं जेव्हा आपण एक बाळ आपल्या डोळ्यासमोर मोठं होताना पाहतो. ते नातं फार खास असतं… याकडे मी दुर्लक्ष देखील करू शकत नाही… ही माझ्या आयुष्यातील एक ट्रॅजेडी आहे…’ असं देखील अनुपम खेर म्हणाले. अनुपम खेर कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात.
