रस्त्यावर नको त्या अवस्थेत दिसली अभिनेत्री, पोलिसांकडून रेस्क्यू, कुटुंबाशी संपर्क साधला पण…
Actress Life : रॉयल आयुष्य जगणाऱ्या अभिनेत्री का झाली अशी अवस्था, रस्त्यावर नकोत्या अवस्थेत दिसली फिरताना, पोलिसांनी रेस्क्यू करत कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण...

Actress Life: फिल्मी दुनिया एक अशी मायानगरी आहे, ज्यामध्ये प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली की एखादं गड जिंकल्यासारखं आहे. पण ही लोकप्रियता देखील फार काळ टिकतं नाही. इंडस्ट्रीने अनेकांना हिरो पासून झीरो केलं आहे. या झगमगत्या विश्वात सेलिब्रिटी कधी रस्त्यावर येतील काहीही सांगता येत नाही… आता देखील असंच काही झालं आहे. अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री रस्त्यावर नको त्या अवस्थेत फिरताना दिसली. पोलिसांनी अभिनेत्रीला रेस्क्यू आणि कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांशी संपर्क होऊ शकला नाही.
ज्या अभिनेत्रीला पोलिसांनी रेस्क्यू केलं आहे तिचं नाव सुमी हर चौधरी असून ती बंगाली अभिनेत्री आहे. नुकताच मोठी माहिती समोर आली, ज्यामध्ये पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यात सुमी हर चौधरी दयनीय अवस्थेत आढळल्याचं सांगण्यात आलं.अभिनेत्रीची ओळख पटणं देखील कठीण झालं होतं. सुमी पावसापासून बचाव करण्यासाठी जागा शोधत असताना खंडघोष भागात रस्त्याच्या कडेला स्थानिकांनी तिला पहिल्यांदा पाहिले.
सुमी चौधरी बद्दल काय म्हणाले पोलीस?
रिपोर्टनुसार, शॉर्ट्स आणि काळ्या शर्टमध्ये सुमी एका कागदावर काहीतरी लिहिताना आणि बांग्ला-इंग्लिशमध्ये काहीतरी बडबड करताना दिसली. ती स्पष्टपणे बोलू शकत देखील नव्हती, पण जेव्हा लोकांनी तिला विचारलं की ती कोण आहे आणि कुठून आली आहे, तेव्हा ती फक्त एवढंच म्हणू शकली की ती एक अभिनेत्री आहे आणि तिने सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केले आहे. काही लोकांनी गुगलवर सर्च केलं तेव्हा त्यांना कळलं की ती खरं बोलत आहे.
View this post on Instagram
सध्या सुमी हिला एका शेल्टर होममध्ये पाठवण्यात आलं आहे. पोलिस तिच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती एक अभिनेत्री आहे हे स्पष्ट आहे आणि तिला मानसिक आजार असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु ती रस्त्यावर कशी पोहोचली आणि ती अशा स्थितीत कशी आली याचा अद्याप तपास सुरू आहे.
सुमी हर चौधरी हिचे सिनेमे आणि मालिका?
सुमी हर चौधरीचे एक इंस्टाग्राम अकाउंट आहे, ज्यावर तिची शेवटची पोस्ट 6 एप्रिलची आहे. तिचं अकाउंट पाहिले तर समजेल की ती खोटं बोलत नाहीये आणि तिने काही मालिका आणि सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. रिपोर्टनुसार, सुमी हिने अनेक बंगाली सिनेमांमध्ये काम केलं आहे. शिवाय मालिकांमध्ये देखील काम केलं आहे.
सुमीने दिग्दर्शक सृजित मुखर्जी यांच्या ‘द्वितियो पुरुष’ या क्राइम थ्रिलर सिनेमात काम केलं होतं, याशिवाय तिने ‘रुपसगोर मोनेर मानुष’ आणि ‘तुमी आशे पाशे थकले’ सारखे सिनेमां मध्येही काम केलं आहेत. ती नसीरुद्दीन शाहसोबत खाशी कथा: अ गोट सागा या बंगाली सिनेमातही दिसली होती.
