समुद्रकिनारी निवस्त्र फिरणारी ‘ती’ बोल्ड अभिनेत्री, लग्नानंतरही अनेकांसोबत प्रेमसंबंध, पण का स्वीकारला संन्यास?
Actress Life: समुद्र किनारी निवस्त्र फिरणाऱ्या अभिनेत्रीने लग्नानंतरही अनेकांसोबत प्रेमसंबंध, मुलाच्या आत्महत्येनंतर सर्वकाही संपलं, तिचा अंत देखील अत्यंत वेदनादायी....

Actress Life: बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आल्या. अशाच अभिनेत्रीपैकी एक म्हणजे दिवंगत अभिनेत्री, डान्सर, मॉडेल प्रोतिमा बेदी… प्रेमसंबंध आणि न्यूड फोटोंमुळे चर्चेत आलेल्या प्रोतिमाचं निधन देखील अत्यंत वेदनादायी होतं. तिचं खासगी आयुष्य कोणापासून लपलेलं नाही. कायम आपल्या अटींवर जगणाऱ्या प्रोतिमा हिने अनेकांना डेट केलं. पण मुलाच्या निधनानंतर अभिनेत्री पूर्णपणे कोलमडली आणि तिने संन्यास घेतला.
70 च्या दशकात ती एक उत्तम मॉडेल होती, तिने फॅशन आणि नृत्याच्या जगात प्रचंड प्रसिद्धी मिळवली. प्रोतिमा बेदी हिने अभिनेते कबीर बेदी यांच्याशी लग्न केले, काही वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघेही वेगळे झाले. घटस्फोटानंतर प्रोतिमाच्या आयुष्यात अनेक पुरुषांची एन्ट्री झाली. ज्यामध्ये पंडित जसराज देखील सामिल होते.
सांगायचं झालं तर, प्रोतिमा हिच्या आयुष्यात घटस्फोटानंतर ज्या पुरुषांची एन्ट्री झाली ते पुरुष विवाहित होते आणि काही काळ प्रोतिमा हिच्यासोबत राहिल्यानंतर त्यांनी प्रोतिमा हिचा त्याग केला आणि कुटुंबाची निवड केली. त्यानंतर पुन्हा प्रोतिमा हिच्या आयुष्यात एकटेपणा आला.
आपलं आयुष्य स्वतःच्या अटी – शर्तींवर जगणाऱ्या प्रोतिमा हिचे त्याकाळातील सर्वात बोल्ड अभिनेत्री होती. तिचे समुद्रकिनाऱ्यावरील न्यूड फोटो देखील तुफान व्हायरल झाले. प्रोतिमाचं तिच्या या फोटोंबद्दल वेगळं मत होतं. तिच्या मते, “जर मी नग्न होते तर काय फरक पडतो? ते पूर्णपणे नैसर्गिक आहे. माझे शरीर चांगलं आहे, मला लाज वाटत नाही.”
कायम बिनधास्त जगणारी प्रोतिमा मुलाच्या आत्महत्येनंतर मात्र पूर्णपणे कोलमडली. ज्यामुळे तिने बॉलिवूडपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि हिमालयात गेली. तिने स्वतःचं नाव देखील बदललं आणि गौरी ठेवलं. एवढंच नाही तर, टक्कल देखील केलं. अभिनेत्री संन्यास घेतला.
असं देखील म्हटलं जातं की, कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान भूस्खलन झालं ज्यामध्ये अभिनेत्रीचा मृत्यू झाला. जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, अनेक दिवसांच्या शोधानंतर तिचा मृतदेह सापडला.
