प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या बिल्डिंगमध्ये घडला भयानक प्रकार, कॅमेऱ्यासमोर अश्लील चाळे, तोडफोड आणि…
Bollywood Celebrities: तो आला, त्याने लिफ्टची तोडफोड केली, , कॅमेऱ्यासमोर अश्लील चाळे केले आणि..., प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटींच्या बिल्डिंगमध्ये घडला भयानक प्रकार

Bollywood Celebrities: बॉलिवूडकरांची सुरक्षा देखील आता वाऱ्यावर असल्याचं चित्र दिसून येत आहे. कारण थेट सेलिब्रिटींच्या बिल्डिंगमध्ये अज्ञात व्यक्तींच्या घुसखोरी करण्याच्या घटना दिवसागणिक वाढत आहेत. आता देखील असंच काही घडलं आहे. अभिनेत्री कृति सनॉन, जावेद जाफरी आणि क्रिकेटर केएल राहुल – पत्नी अथिया शेट्टी राहत असलेल्या बिल्डिंग एक अज्ञात व्यक्ती अचानक घुसला आणि त्याने लिफ्टमध्ये तोडफोड केली. एवढंच नाही तर, त्याने कॅमेऱ्याकडे पाहून अश्लील चाळे देखील केले.
याप्रकरणी पोलिसांत तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. बिल्डिंगचे सुरक्षा व्यवस्थापक उमेश सराटे यांनी खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रिपोर्टनुसार, बिल्डिंगमध्ये घुसणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पाली हिलच्या पॉश भागात असलेल्या ‘संधू पॅलेस’ या हाय प्रोफाइल बिल्डिंगमध्ये बुधवारी रात्री उशिरा एक माणूस कारने आला. त्याने सुरक्षा रक्षकाला सांगितलं की त्याला 17 व्या मजल्यावर जायचं आहे. त्या मजल्याच्या मालकाने सुरक्षा रक्षकांना सांगितलं होतं की, त्याला भेटायला येणाऱ्या कोणालाही लगेच पाठवा. अशात त्या व्यक्तीला लगेच बिल्डिंगमध्ये प्रवेश मिळाला.
संशय आल्यानंतर व्यक्तीला काढलं बाहेर…
व्यक्तीने गाडी बेसमेंटमध्ये पार्क केली, वॉशरूममध्ये गेला. मग त्याने गार्डला 14 व्या मजल्यावर जाण्यास सांगितलं. गार्डने त्या मजल्याच्या मालकाला फोन केला तेव्हा कोणीही फोन उचलला नाही. मग त्याने पुन्हा 17 व्या मजल्यावर जायचं आहे असं सांगितलं. अखेर संशय आल्यानंतर व्यक्तीला बिल्डिंगमधून बाहेर जाण्यास सांगितलं.
लिफ्टमध्ये मोठे दगड होते.
यानंतर, दुसऱ्या दिवशी सकाळी लिफ्ट बंद झाल्यानंतर जेव्हा लिफ्ट उघडण्यात आली तेव्हा त्यात मोठे दगड आढळले. लिफ्टची तोडफोड केल्यानंतर, तो माणूस कॅमेऱ्याकडे पाहत अश्लील हावभाव करत होता. सध्या याप्रकरणी पोलीस देखील पुढील तपास करत आहेत.
फराह खान हिता व्लॉग
या बिल्डिंगमध्ये जावेद जाफरी यांचा एक आलिशान फ्लॅट आहे, ज्यामध्ये फराह खान गेली होती. तिने एक व्लॉग बनवला आणि घराचा प्रत्येक कोपरा-कोपपा दाखवला होता.
