AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग बॉस चाहते हैं… नव्या सीझनमध्ये नसणार हा आवाज, Bigg Boss 19 मध्ये 5 मोठे बदल

Bigg Boss 19 Update: बिग बॉस 19 मध्ये होणारे 5 मोठे बदल, तीन नाही तर, इतके महिने सुरु राहणार शो, सलमान खानबद्दल देखील मोठी अपडेट समोर..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बिग बॉस 19 सध्या तुफान चर्चेत...

बिग बॉस चाहते हैं... नव्या सीझनमध्ये नसणार हा आवाज, Bigg Boss 19 मध्ये 5 मोठे बदल
फाईल फोटो
| Updated on: Jul 24, 2025 | 10:34 AM
Share

Bigg Boss 19 Update: अभिनेता सलमान खान याचा वादग्रस्त शो ‘बिग बॉस 19’ लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. टीव्ही आणि जियो हॉटस्टारवर शो प्रसारित होणार आहे. शो कधी प्रेक्षकांच्या भेटीस येईल अद्याप कळलेलं नाही. पण शोचे महत्त्वाचे अपडेट मात्र हळू-हळू समोर यायला लागले आहेत. सलमान खान याने ‘बिग बॉस 19’ साठी प्रोमो शूट केला अशी माहिती समोर आली. आता शोबद्दल नवीन अपडेट समोर आलं आहे. शोमध्ये ‘बिग बॉस चाहते हैं…’ हा डायलॉग आता प्रेक्षकांना ऐकू येणार नाही. तर शोमध्ये 2 थीम असून महत्त्वाचे 5 बदल यंदाच्या सीझनमध्ये करण्यात आले आहेत.

‘बिग बॉस 19’ मध्ये प्रसिद्ध डायलॉग बदलणार…

‘बिग बॉस 19’ च्या ताज्या रिपोर्टनुसार, बिग बॉस में बदल जाएगा फेमस डायलॉग बदलणार आहे. यावेळी ‘बिग बॉस 19’ च्या स्वरूपात मोठा बदल होणार आहे. प्रत्येक सीझनप्रमाणे या सीझनमध्ये ‘बिग बॉस चाहते हैं’ ऐकायला मिळणार नाही. त्याऐवजी ‘बिग बॉस जानता चाहते हैं’ ऐकायला मिळेल.

कामात असेल पूर्ण सूट…

रिपोर्टमध्ये पुढे म्हटलं आहे की, सलमान खानच्या शोमध्ये येणाऱ्या स्पर्धकांना घरकामात पूर्ण स्वातंत्र्य दिले जाईल. म्हणजेच घर चालवण्याची जबाबदारी पूर्णपणे स्पर्धकांवर असेल. रेशन ठरवण्यापासून ते कोण कोणतं काम करेल यापर्यंत, सर्व काही स्पर्धक ठरवतील. बिग बॉस यामध्ये हस्तक्षेप करणार नाही.

‘बिग बॉस 19’ मध्ये असणार 2 थीम

बिग बॉसच्या प्रत्येक सीझनची थीम दरवेळी वेगळी असते. नवीन सीझनमध्ये, निर्माते दोन थीम घेऊन परतत आहेत. हे थोडं विचित्र वाटेल पण खूप मजेदार असणार आहे. ‘बिग बॉस 19’ ची पहिली थीम राजकीय असेल आणि दुसरी थीम रिबाउंड असेल.

थीमनुसार स्पर्धक

बिग बॉसच्या नवीन अपडेटमध्ये असे म्हटलं आहे की, यावेळी बिग बॉस 19 मध्ये दोन थीम असतील आणि त्यानुसार सेलिब्रिटींनाही संपर्क साधला जात आहे. देशातील मोठ्या मुद्द्यांशी जोडल्या गेलेल्या सेलिब्रिटींनाच या शोमध्ये आमंत्रित केलं जाईल. उदाहरणार्थ, इंडियाज गॉट टॅलेंटच्या वादामुळे अपूर्व मुखिजाशी संपर्क साधण्यात आला आहे.

शोमध्ये असतील तीन होस्ट

शोची सर्वांत महत्त्वाची अपडेट म्हणजे शोमध्ये तीन सेलिब्रिटी शो होस्ट करणार आहे. याआधी अनेक शो एकट्या सलमान खान याने होस्ट केले आहेत. करण जौहर, फराह खान आणि अनिल कपूर देखील शो होस्ट करतील असं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या महितीनुसार, शोच्या सेटचं काम 20 ऑगस्टपर्यंत पुर्ण होईल. 28 ऑगस्ट रोजी सलमान खान याच्या भागाची शूटिंग होईल. त्यानंतर 29 ऑगस्ट रोजी स्पर्धकांच्या डांस परफॉर्मेंस शूटिंग होईल…

दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ.