AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी परत येणार! हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजितदादांनी काय दिल्या होत्या सूचना?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात खळबळ व्यक्त केली जात आहे. अजित दादांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला जात आहे. एका नागपूरातील विजयगड बंगल्याचे अधिकारी राजेंद्र बारई यांनी देखील अजित पवारांच्या शेवटच्या आठवणी सांगितल्या आहेत.

मी परत येणार! हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजितदादांनी काय दिल्या होत्या सूचना?
Ajit pawarImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 29, 2026 | 5:02 PM
Share

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्क बसला. बारामती विमानतळावर घडलेल्या या घटनेने संपूर्ण राज्य सुन्न झालं. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजितदादा जे काही म्हणाले ते आठवून बंगल्याचे अधिकारी भावूक झाले आहेत.

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पुण्याला परत जाताना अजित दादा यांनी नागपूरातील विजयगड बंगल्यातील झाडांचे फोटो काढले, आणि आपल्या खास शैलीत अधिकाऱ्यांना सांगीतलं… “मी परत येणार, इथली झाडं, वस्तू जशाच्या तशा असायला हव्या. आज अजित दादा नाही, पण विजयगड बंगल्यातील प्रत्येक रोपटं, झाडं, इथली वास्तू अजीत दादांच्या वास्तव्याची साक्ष देतात. विजयगड बंगल्याचे अधिकारी राजेंद्र बारई यांनी अजित दादांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

नागपुरातील अजित दादांचा शासकीय बंगला ‘विजयगड’ मधील आजचे वातावरण खूप वेगळे आहे. अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यावर 2024च्या हिवाळी अधिवेशनाच्या 22 दिवसांपूर्वी ‘विजयगड’ बंगला तयार करण्यात आला होता. बंगल्याची डागडुजी करताना दादांनी स्वतः काही सूचना दिल्या होत्या. बंगल्यात नीटनेटकेपणा, सोबरनेस, वायरचा एक तुकडाही दिसता कामा नये अश्या सूचना दादांनी दिल्या होत्या. तसेच बंगल्याचे बांधकाम करताना भेटायला येणाऱ्या लोकांची खास काळजी घेण्याच्या सूचना दादांनी दिल्या होत्या.

अजित पवार यांचे अपघाती निधन

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. विमान आकाशात असताना स्फोट झाला. त्यानंतर विमान थोडे झुकले आणि विमानतळाच्या आधीच एका शेतात कोसळले. त्यानंतर विमानाचे आणखी दोन-तीन स्फोट झाले. विमानात अजितदादांसह असलेल्या चार जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. आज 29 जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर शासकीय सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक प्रमुख नेते त्यावेळी उपस्थित होते.

Follow Us
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?