Sai Pallavi : डॉक्टर व्हायचं सोडून अभिनेत्री का झाली साई पल्लवी ? रणबीर कपूरच्या एका वाक्याने KBCच्या सेटवर हास्यकल्लोळ
रणबीर कपूर आणि साई पल्लवी हे दोघे, त्यांच्या आगामी 'रामायण' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. नुकतेच ते'कौन बनेगा करोडपती' च्या सेटवर आले होते, तेव्हा रणबीरच्या हजरजबाबीपणामुळे संपूर्ण सेट हास्यात बुडून गेला.

अभिनेता रणबीर कपूर आणि साई पल्लवी हे दोघे, त्यांच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. रिलीज होण्याच्या आधीच प्रेक्षक या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक असून मोठी क्रेझ पहायला मिळत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘रामायण’ चे कलाकार नुकतेच ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर पोहोचले. तेव्हा श्रीराम-सीतामाई यांच्यासोबत ‘लक्ष्मण’ अर्थात अभिनेता रवि दुबे हाही आला होता. शोचा काही भाग ब्रॉडकास्टर्सनी जारी केला असून, त्यातील एका क्लिपची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या नव्या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन यांनी साऊथ सुपरस्टार , अभिनेत्री साई पल्लवी हिला तिच्या MBBS सोडण्याच्या निर्णयाबद्दल प्रश्न विचारला होता.
साई पल्लवीने डॉक्टरकी सोडली, रणबीरची भन्नाट रिॲक्शन व्हायरल
रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेला ‘रामायण’ हा चित्रपट येत्या 5 नोव्हेंबर 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची कमाई 200 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. चित्रपटातील संपूर्ण कलाकार सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘रामायण’ची टीम अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती 18’ या शोमध्ये पोहोचली. या कार्यक्रमातील एक क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉक्टर होण्याऐवजी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्न याच शोदरम्यान केबीसीचे होस्ट आणि दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी साई पल्लवीला विचारला. “तुम्ही डॉक्टर होण्यासाठी शिक्षण घेतलं होतं आणि आता इथे आलात. असं कसं झालं?” असं अमिताभ बच्चन यांनी साई पल्लवीला विचारलं.
यावर बोलताना साई पल्लवी हिने नम्रपणे होकार देत, कदाचित आपल्या नशिबात अभिनेत्री होणंच लिहिलं असावं, असं सांगितलं. ती म्हणाली, “ देवाने तसंच लिहिलं होतं. मला अभिनय करायचा आहे, ( बहुतेक) हे आधीपासूनच ठरलेलं होतं.” तिचं हे उत्तर ऐकल्यानंतर प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचं कौतुक केले. मात्र तिच्या शेजारीच बसलेल्या रणबीर कपूरनेही या निर्णयाबाबत मत मांडलं. ‘सर, हे तर देवाचं प्रिस्क्रिप्शन होतं, की तिला अभिनयचं करायचा आहे.’ त्याच्या या मजेशीर उत्तरामुळे, हजरजबाबीपणामुळे अख्खा सेट हास्यकल्लोळात बुडून गेला.
साई पल्लवीने ‘रामायण’मध्ये सीता होण्याचा निर्णय कसा घेतला ?
‘रामायण’ चित्रपटात सीतेची दिव्य भूमिका साकारण्याचा अनुभव सांगताना साई पल्लवीने म्हटलं की, ही व्यक्तिरेखेला साकारताना तिला बुद्धीपेक्षा मनावर आणि भावनांवर अधिक विश्वास ठेवायचा होता. ती म्हणाली की एखादी व्यक्तिरेखा साकारताना मी सहसा त्या भूमिकेसाठी स्वतः काय करू शकते, याचा विचार करते. मात्र, सीतेसारखी पूजनीय राणीची भूमिका साकारताना माझा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा होता. असं तिने नमूद केलं. या भूमिकेसाठी आपण काय देऊ शकतो, यापेक्षा ही पवित्र व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाल्यामुळे आपल्याला काय शिकायला आणि अनुभवायला मिळेल, याचा विचार करत होती, असंही साई पल्लवीने सांगितलं.
KBC सेटवर रणबीर- साई पल्लवीसह पोहोचला रवी दुबे
‘रामायण’ च्या कलाकारांसोबतचा हा स्पेशल एपिसोड 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी टेलिकास्ट होणार आहे. दिवाळीच्या काही दिवस आधीच, 5 नोव्हेंबर रोजी जगभरात रिलीजपूर्वी ‘रामायण’ ची टीम कोलकाता, हैदराबाद आणि चेन्नई येथे जाऊन जोरात प्रमोशन करत आहे. बॉक्स ऑफीसवर हा चित्रपट हिट होईल अशी सर्वांना अपेक्षा आहे. केबीसीच्या सेटवर रणबीर आणि साई यांच्यासह रवि देबीही आला होता.
‘रामायण’ ची शानदार कास्ट
नमित मल्होत्राची निर्मित असलेल्या ‘रामायण’ मध्ये रणबीर कपूर ‘श्रीरामा’ची भूमिका साकारत आहे. तर साई पल्लवी ही सीतामाईच्या भूमिकेत आणि रवि दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता यश हा रावण साकारणार असून सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसतील.