Viral Video : हे तुमच्याच मेहनतीचे फळ….. कंपनीच्या CEO ने कर्मचाऱ्यांना गिफ्ट मध्ये दिली Kia sonet
हरियाणात अशी देखील एक कंपनी असित्वात आहे. जिच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून चक्क नवी कार देण्यात आली आहे. अशी तशी कार नव्हे तर थेट Kia sonet आणि घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आपल्याकडे दिवाळीत गिफ्ट म्हणून काय मिळतं? तर फार फार तर मिठाईचा डब्बा, महागडे ड्रायफ्रुट्स, फराळ तर कुणाला जास्तीत जास्त छोटीशी भेटवस्तू! पण हरियाणात अशी देखील एक कंपनी असित्वात आहे. जिच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून चक्क नवी कार देण्यात आली आहे. अशी तशी कार नव्हे तर थेट Kia sonet आणि घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही गोष्ट आहे हरियाणातील पंचकुला इथल्या MITS Healthcare या कंपनीची. कंपनीचे संस्थापक M.K भाटिया आणि CEO शिल्पा चंदेल यांनी 4 कर्मचाऱ्यांना नवीन Kia Sonet कार भेट दिल्या. कर्मचाऱ्यांनी वर्षभर केलेली मेहनत, कामाप्रती असलेली निष्ठा आणि कर्मचाऱ्यांनी वर्षभर केलेली मेहनत, कामाप्रती असलेली निष्ठा आणि कंपनीच्या प्रगतीत दिलेलं योगदान लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
कंपनीने या खास क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यात चारही गाड्यांवर काळं कापडं झाकलेलं दिसतं. त्यानंतर एकेक कर्मचारी पुढे येतो आणि आपल्या नवीन गाडीवरील कापडं बाजूला करतो. गाडी पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. तिथं केक कापूनही आनंद साजरा करण्यात आला. या वेळी नितीन नेगी, निर्मल, वीनस आणि गुरवीर या चार कर्मचाऱ्यांना कार देण्यात आल्या. कंपनीने त्यांच्या मेहनतीचा आणि योगदानाचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम राबल्याचं सांगितलं आहे.
कंपनी पहिल्यादांच करत असेल
नाही बरं का!कर्मचाऱ्यांना कार देण्याची ही कंपनीची पहिलीच वेळ नाही. एम. के.भाटिया हे दिवाळीच्या काळात कर्मचाऱ्यांना कार देण्याच्या उपक्रमासाठी याआधीही चर्चेत आले आहेत. गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये कर्मचाऱ्यांना kia Sonet देऊन हा उपक्रम पुढे सुरू ठेवण्यात आला आहे.
View this post on Instagram
नेटकरी विचारत आहेत आमच्या कंपनीत असं कधी होणार?
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने आपल्या कंपनीला उद्देशून म्हटलं की, ” आमच्या कंपनीचं प्रेम केव्हा बाहेर येणार, कर्मचाऱ्यांचे कष्ट केव्हा कळणार अशा कमेंट्स केल्या आहेत. तर दुसऱ्या यूजरने म्हटलं आहे की, ” मेहनत तर आम्हीही करतो, पण आमच्या वाट्याला मिठाईचा डब्बा येतो. थोडक्यात काय तर दिवाळीला भेटवस्तू मिळणं ही वेगळी गोष्ट, पण वर्षभर मेहनत करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाची दखल घेऊन एवढं मोठं बक्षीस देणं ही नक्कीच चर्चेची बाब आहे.
