
अभिनेता सैफ अली खान प्रकरणी रोज नवीन अपडेट समोर येत आहेत. आता अधिक तपास करण्यासाठी आरोपी मोहम्मद शरीफुल याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 29 जानेवारी पर्यंत सैफच्या आरोपीची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. तर पोलीस आता कोणत्या गोष्टींचा तपास करतील याबाबत देखील माहिती समोर आली आहे. आरोपीला ठाण्यातून अटत केल्यानंतर तपासाला नवी दिशा मिळाली आहे.
आरोपी बांगलादेशमधून इकडे कसा आणि कोणाच्या मदतीने आला याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. तर सीसीटीव्हीत दिसणारा चेहरा आणि आरोपीच्या चेहऱ्याची फॉरेन्सिक फेस रिकग्नेशन पडताळणी करणे आवश्यक आहे… असं देखील पोलिसांचं म्हणणं आहे.
आरोपीला सैफच्या घरात घुसण्यासाठी कोणी सांगितल होत का ? कोणी त्याला मदत केली का याचा शोध घ्यायचा आहे असे पोलिसानी कोर्टात म्हटलं. आरोपीने सैफच्या घरात कुठून प्रवेश मिळवला आणि कुठून बाहेर पडला हे पोलीस तपासात समोर आलं आहे.
आरोपी नक्की कोणत्या उद्देशाने सैफ – करिना यांच्या घरात घुसला याचं कारण देखील पोलिसांना शोधायचं आहे. यावर करीनाने जबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. ‘घरात समोर दागिने होते पण हल्लेखोराने दागिन्यांना हात देखील लावला नाही…’ असं करीना म्हणाली. अशात आरोपीचा नक्की उद्देश काय होता… यावर पोलिसांना तपास करायचा आहे.
आरोपीने सैफवर हल्ला करण्यासाठी वापरलेला चाकूचा एक तुकडा सैफच्या शरीरात, दुसरा तुकडा सैफच्या घरात आणि तिसरा तुकडा वांद्र्याच्या तलावात सापडला. तर आरोपी बांगलादेशीच आहे हे कागदपत्रांवरून स्पष्ट झालं आहे. आरोपीने गुन्ह्याच्या वेळी वापरलेले कपडे जप्त करण्यात आलेले आहेत.