सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठी अपडेट समोर, हल्लेखोराचा मोठा दावा

Saif Ali Khan Case: सैफ अली खान याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या 6 महिने, हल्ल्या प्रकरणी मोठी अपडेट अखेर समोर, न्यायालयात हल्लेखोराचा मोठा दावा, सध्या सर्वत्र सैफ अली खान हल्ला प्रकरणाची चर्चा...

सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठी अपडेट समोर, हल्लेखोराचा मोठा दावा
फाईल फोटो
| Updated on: Jul 20, 2025 | 8:36 AM

Saif Ali Khan Case: अभिनेता सैफ अली खान याच्यावर 16 जानेवारी रोजी हल्ला करण्यात आला. याप्रकरणी अद्याप तपास सुरु आहे. सैफ अली खान प्रकरणातील आरोपी शरीफुलनी जामिनाची मागणी करताना अर्जात मोठा दावा केला आहे. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद सध्या सैफ अली खान याच्यावर हल्ला केल्याप्रकरणी तुरुंगात आहे. बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याने मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे.

मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद म्हणाली, ‘मी निर्दोष असून माझ्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा हा काल्पनिक आहे…’ जामिनाची मगणी करत त्याने असा दावा केला आहे. न्यायालयाने देखील त्याच्या या अर्जाची दखल घेऊन सरकारी पक्षाला 21 जुलैपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

शरीफुल सध्या आर्थर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. त्याने आधी एप्रिल महिन्यात सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. पण त्याने हा अर्ज मागे घेतला आणि वांद्रे दंडाधिकाऱ्यांकडे नव्याने अर्ज केला. बांद्रा दंडाधिकारी न्यायालयाने त्याला जामीन देण्यास नकार दिल्यानंतर शरीफुल याने आता पुन्हा एकदा सत्र न्यायालयात धाव घेऊन जामिनासाठी अर्ज केला आहे.

सैफ अली खान याच्यावर झालेला हल्ला

16 जानेवारी 2025 मध्ये सैफ अली खान याच्या वांद्रे येथीस घरात एक अज्ञात व्यक्ती घूसला. ते जेहच्या खोलीच्या दिशेने जात होता. तेव्हात करातील स्टाफने गोंगाट केला आणि सैफ त्याच्या खोलीतून बाहेर आला. दोघांमध्ये मारहाण देखील झाली. हल्लेखोर अधिक आक्रमक होता. त्याने सैफवर 6 हल्ले केले. ज्यामुळे अभिनेता रक्तबंबाळ झाला.

 

 

हल्लयानंतर सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. दोघांनी देखील मुलं तैमूर अली खान आणि जेह अली खान यांच्यासाठी ‘नो फोटो पॉलिसी’ लागू केली आहे. आता सार्वजनिक ठिकाणी देखील तैमूर आणि जेह दिसत नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us