Saif Ali Khan Receives Death Threat: ‘तुझाही बाबा सिद्दिकींसारखा शेवट…’ अभिनेता सैफ अली खानला धमकी!

सोशल मीडियावर एक ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे, ज्यामध्ये सैफ अली खानला धमकी दिली जात आहे. ही धमकी रोहित गोदारा गँगने दिल्याचे म्हटले जात आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख रोहित गोदारा गँगचा सदस्य झीशान अख्तर अशी दिली आहे.

Saif Ali Khan Receives Death Threat: तुझाही बाबा सिद्दिकींसारखा शेवट... अभिनेता सैफ अली खानला धमकी!
| Updated on: Nov 19, 2026 | 3:45 PM

Saif Ali Khan Receives Death Threat:  गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड कलाकारांना गुंडांकडून धमक्यांचे सत्र सुरु आहे. अभिनेता टायगर श्रॉफच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर आणि अमिताभ बच्चन यांना दिलेल्या धमकीनंतर आता बॉलिवूड अभिनेता स्टार सैफ अली खानलाही धमकी मिळाली आहे. सोशल मीडियावर एक ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे, ज्यामध्ये सैफ अली खानला धमकी दिली जात आहे. ही धमकी रोहित गोदारा गँगने दिल्याचे म्हटले जात आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख रोहित गोदारा गँगचा सदस्य झीशान अख्तर अशी दिली आहे.

धमकी देणाऱ्या व्यक्तीने काय म्हटले?

Loading...

सोशल मीडियावर फिरत असलेल्या कथित ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये, धमकी देणारी व्यक्ती असे म्हणताना ऐकू येते, “सैफ अली खान, बघ, बघ, तुझी पत्नी करीना कपूरने चूक केली आहे. या चुकीचे परिणाम तुला भोगावे लागू शकतात. तुला आधी चाकूने भोसकले होते, पण देवाने तुला वाचवले. जेव्हा आम्ही तुला गोळी घालू, तेव्हा तुझा शेवट बाबा सिद्दिकीसारखा होऊ शकतो.” अशा शब्दात अभिनेता सैफ अली खानला धमकी दिली आहे. या धमक्यांमागे खरोखरच झीशान अख्तर आहे की सेलिब्रिटींना लक्ष्य करण्यासाठी आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना त्रास देण्यासाठी कोणीतरी दुसरे त्याचे नाव वापरत आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

धमक्यांनंतर चित्रपट कलाकारांकडून सुरक्षेची मागणी

मुंबईतील अनेक चित्रपट कलाकारांनी धमक्यांचे कारण देत विशेष सुरक्षेची मागणी केली आहे. धोक्याच्या तीव्रतेचा आढावा घेतल्यानंतर, त्यांना ‘एक्स-कॅटेगरी’ सुरक्षा मंजूर होण्याची शक्यता आहे. पोलीस सूत्रांनुसार, मुंबई पोलिसांची संरक्षण शाखा सध्या या अर्जांची आणि धमक्यांच्या सत्यतेची चौकशी करत आहे. धोक्याच्या तीव्रतेचे मूल्यांकन केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. ‘एक्स-कॅटेगरी’ सुरक्षेमध्ये सामान्यतः दोन सशस्त्र सुरक्षा कर्मचाऱ्यांची तैनाती असते. तथापि, अद्याप कोणताही अधिकृत आदेश जारी करण्यात आलेला नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us