AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादा अपघात प्रकरणात रोहित पवारांचा आणखी एक खळबळजनक गौप्यस्फोट, व्ही. के. सिंग यांच्याबद्दल मोठा दावा

काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात एक पत्रकार परिषद घेतली होती, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मोठा दावा केला होता, यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर पुन्हा एकदा रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

अजितदादा अपघात प्रकरणात रोहित पवारांचा आणखी एक खळबळजनक गौप्यस्फोट, व्ही. के. सिंग यांच्याबद्दल मोठा दावा
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 19, 2026 | 3:28 PM
Share

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांच्या अपघातावर बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात मोठा दावा केला होता. यावरून भाजपने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना आता पुन्हा एकदा रोहित पवार यांनी व्हिएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. रोहित पवार यांच्या या दाव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.  व्ही. के. सिंग अमेरिकेला जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे,  व्ही. के. सिंग यांनी पाच विमाने अमेरिकेत ट्रान्सफर केली आहेत, असा धक्कादायक दावा यावेळी रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांच्या या नव्या दाव्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?  

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना काल संध्याकाळी पत्र लिहून काही शंका उपस्थित केल्या,   या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली आहे. पत्रातील प्रश्नांवर अमित शाह यांच्या उत्तराची प्रतीक्षा करणार आहे.  आमच्याकडे काही महत्त्वाचे पुरावे आले असून, ते आगामी काळात सादर करणार आहे.  व्ही. के. सिंग अमेरिकेला जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.  व्ही. के. सिंग यांनी पाच विमाने अमेरिकेत ट्रान्सफर केली आहेत.  व्ही. के. सिंग यांची दोन मुले अमेरिकेत राहायला गेली आहेत.  व्ही. के. सिंग यांना देशाबाहेर जाऊ द्यायचे की नाही? याचा निर्णय आता सरकारने घ्यावा. या संदर्भातील महत्त्वाची माहिती अमित शाह यांना दिली आहे. असं यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी एका पुतण्याच्या भूमिकेतून प्रयत्न सुरू आहेत. अजितदादांच्या प्रकरणात केलेले प्रेझेंटेशन हे राजकीय नसून अराजकीय दृष्टिकोनातून केलं आहे.  मोठ्या नेत्याला न्याय मिळत नसेल, तर सामान्य माणसाला न्याय कसा मिळणार?  सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या प्रमुख म्हणून भूमिका मांडली, पवार कुटुंबातील सदस्य म्हणून विचारल्यास त्यांचा पाठिंबा राहील.  अजितदादांना न्याय मिळावा यासाठी नाना पटोले, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि खासदार नीलेश लंके यांच्यासह ज्या नेत्यांनी पाठिंबा दिला, त्यांचे आभार मानतो, असंही यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे.  राजकारण आज नाही तर उद्या करता येईल,  मात्र अजितदादांना न्याय मिळणे महत्त्वाचे, असंही ते यावेळी म्हणाले.

Follow Us
बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी....
Shaina NC : बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी यांनी मागितली महाराष्ट्राची माफी
पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; दमदाटीचा व्हिडिओ..
Congress : पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी दमदाटीचा व्हिडिओ व्हायरल
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रा...
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रेच्या तयारीचा घेतला आढावा
न्यायालयाचा आदेश तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा
kolhapur Balumama Devasthan : न्यायालयाचा आदेश आणि SIT ची मनाई तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा चर्चेत
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा BJP..
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा भाजपमध्ये प्रवेश
मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमान
Sanjay Nirupam : मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमानावरून संजय निरुपम आक्रमक
दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना
Dadar : दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना वेग!
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकर
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकरांचा थेट कोर्टात खेचणार असा इशारा!
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! PM नरेंद्र मोदी यांनी सांगितले...
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले कर सुधारणांचे फायदे
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा थेट पुरावे दाखवत दावा