Saif Ali Khan : बहिणी शाळेत असतानाच सैफने गुपचूप पहिलं लग्न उरकलेलं तेव्हा…, अनेक वर्षानंतर मोठं रहस्य समोर
Saif Ali Khan : बहिणी शाळेत असताना सैफने अमृता सिंगसोबत गुपचूप लग्न केलं, बहिणींना देखील नव्हतं माहिती मोठ्या भावाच्या लग्नाबद्दल, किती होतं तेव्हा त्यांचं वय? अनेक वर्षानंतर मोठं रहस्य समोर

Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खान आता दुसरी पत्नी करीना कपूर आणि त्याच्या दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा सैफ याच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी जोर धरलेला. सैफ याचं पहिलं लग्न अभिनेत्री अमृता सिंह हिच्यासोबत फार कमी वयात झालं. सैफ आणि अमृता यांनी कुटुंबियांना काहीच न सांगता गुपचूप लग्न केलं. अभिनेत्याच्या लग्नात बहिणी देखील सामिल नव्हत्या तर, बहिणी शाळेत असतानाच सैफ आणि अमृता यांनी लग्न केलं होतं. आता दोघांच्या लग्नाबद्दल बहीण सबा अली खान हिने मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सैफच्या पहिल्या लग्नाची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, अभिनेत्री नेहा धुपिया आणि अभिनेता अंगद बेदी यांच्या नुकताच झालेल्या व्लॉगमध्ये सबाने भावाच्या पहिल्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला. सबा म्हणाली, ‘शाळेत असताना आम्हाला भाईच्या लग्नाबद्दल कळलं… तेव्हा मी 15 वर्षांची होती तर सोहा फक्त 13 वर्षांची होती…’
पुढे सबा म्हणाली, ‘प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये आम्हाला घरुन फोन आलेला आणि सांगितलेलं, तुम्ही दोघी कोणालाच काही बोलणार नाहीत… आम्हाला नव्हतं माहिती की, नेमकी बातमी काय आहे… कारण, ते सर्व फक्त न्यूजपेपरपर्यंत मर्यादित होतं, त्यामुळे आम्हाला सांगण्यात आलं होतं की, कोणाला काहीच बोलायचं नाही…’, हे ऐकल्यानंतर नेहा धुपिया देखील हैराण झाली, कारण बहिणींना देखील भावाच्या लग्नात येता आलं नाही…
सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचं लग्न
सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचं लग्न बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरलेला. 90 च्या दशकात अमृता सिंग हे नाव झगमगत्या विश्वातील फार मोठं नाव होतं, तर सैफ याने नुकताच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. दोघांमध्ये तब्बल 12 वर्षांचं अंतर आहे… 1991 मध्ये दोघांनी गुपचूप लग्न केलं. तेव्हा सैफ फक्त 21 वर्षांचा होता. लग्नानंतर दोघांनी लेक सारा अली खान आणि मुलगा इब्राहिम अली खान याचं जगात स्वागत केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.
सारा अली खान हिने आई – वडिलांच्या लग्नाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं होतं. ‘माझे आई – वडील एकमेकांसोबत कधीच आनंदी नव्हते, म्हणून त्यांचं वेगळं होणंच योग्य होतं.’, अमृता हिच्यापासून विभक्त झाल्यानंतर सैफ याने 2012 मध्ये करीना कपूर हिच्यासोबत लग्न केलं. त्यांना देखील दोन मुलं आहे. तैमूर अली खाण आणि जहांगीर अली खान अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत. तर घटस्फोटानंतर अमृता हिने कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. तिने सिंगल मदर म्हणून तिच्या मुलांचा सांभाळ केला.