सैफ अली खानची 15 हजार कोटींची मालमत्ता जप्त होणार? कुठे आहे ही मालमत्ता, पाकिस्तानात गेलेल्या आजीचं कनेक्शन

अभिनेता सैफ अली खानची 15 हजार कोटींची मालमत्ता जप्त होणार असल्याची चर्चा आहे. शत्रू मालमत्ता म्हणजे काय, कायदा काय म्हणतो, याविषयी जाणून घेऊयात..

सैफ अली खानची 15 हजार कोटींची मालमत्ता जप्त होणार? कुठे आहे ही मालमत्ता, पाकिस्तानात गेलेल्या आजीचं कनेक्शन
सैफ अली खान
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 25, 2025 | 3:21 PM

Saif Ali Khan Enemy Property Case: अभिनेता सैफ अली खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर झालेल्या चाकूहल्ल्यामुळे चर्चेत आहे. पाच दिवसांच्या उपचारानंतर तो घरी परतला आहे. हल्ल्यातून बचावल्यानंतर आता सैफ पुन्हा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. सैफ अली खानची तब्बल 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता सरकार जप्त करणार असल्याची ही चर्चा आहे. सैफची ही 15 हजार कोटींची मालमत्ता कुठे आहे, ती शत्रू संपत्ती ठरवली गेली आहे का, शूत्र मालमत्ता कायदा म्हणजे काय, या सर्व प्रश्नांची उत्तरं सविस्तर जाणून घेऊयात.. नेमका वाद काय? भोपाळमध्ये पतौडी घराण्याची तब्बल 15 हजार कोटींची वंशपरंपरागत मालमत्ता आहे. याच मालमत्तेबद्दलचा हा वाद आहे. ही मालमत्ता आता सरकारच्या ताब्यात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भोपाळमधल्या पतौडी कुटुंबाच्या मालमत्तेला ‘शत्रू मालमत्ता’ घोषित करण्याच्या सरकारी सूचनेविरुद्ध दाखल केलेली सैफची याचिका फेटाळून लावली होती. 13...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा