AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हिरोईनला स्पर्श करताच मला माझ्या आत काहीतरी…’, ‘सैयारा’ फेम अभिनेत्याने सांगितला तो किस्सा

सैयारा फेम अभिनेत्याने चित्रपटातील काम करण्याचा त्या अनुभव सांगितला . तसेच तो हेही म्हणाला की चित्रपटात हिरोईनसोबत सीन करताना त्याला काहीतरी व्हायचं. तो ते सीन करूनच शकत नव्हता. त्यामागील एक कारणसुद्धा त्याने सांगितलं आहे.

'हिरोईनला स्पर्श करताच मला माझ्या आत काहीतरी...', 'सैयारा' फेम अभिनेत्याने सांगितला तो किस्सा
Shaan R Grover Image Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Jul 24, 2025 | 2:35 PM
Share

सध्या कोणत्या चित्रपटाची चर्चा सुरु असेल तो चित्रपट आहे ‘सैयारा’. चित्रपटाचे प्रचंड यश पाहून केवळ प्रेक्षकच नाही तर निर्मातेही आश्चर्यचकित होत आहेत. या वर्षीच्या सर्वात मोठ्या हिट चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत हा चित्रपट पुढे जात आहे. या चित्रपटातील कलाकारांचे देखील खूप कौतुक केलं जातंय. या चित्रपटातील कलाकार आता चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक माध्यमांवर मुलाखती देताना दिसत आहे. आता या चित्रपटातील एका अभिनेत्याचं वक्तव्य फारच चर्चेत आलं आहे.

या अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितलं की तो जेव्हा जेव्हा सीनदरम्यान हिरोईनला स्पर्श करायचा तेव्हा तो थरथर कापायचा. पण त्यामागे एक कारण होतं. जे त्याने सांगितलं आहे. हा अभिनेता चित्रपटातील पात्र महेश म्हणजे शान आर ग्रोव्हरने चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे.

खलनायक महेश अय्यरच्या भूमिकेबद्दल चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत.

‘सैयारा’च्या जबरदस्त यशानंतर, चाहते आता त्याच्या सिक्वेलची वाट पाहत आहेत. चित्रपटात कृष (अहान पांडे) आणि वाणी (अनित पड्डा) यांच्या लव स्टोरीचा शेवट आनंददायी झाला, परंतु खलनायक महेश अय्यरच्या भूमिकेबद्दल चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. आता ही भूमिका साकारणारा अभिनेता शान आर ग्रोव्हरने चित्रपटातील त्याच्या अनुभवाचे वर्णन करताना अनेक खुलासे केले आहेत.

चित्रपटाचा सिक्वेल येणार?

‘सैयारा’ मध्ये शान आर ग्रोव्हरने अनित पड्डा बॉयफ्रेंडची भूमिका साकारली आहे. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला, ‘माझ्या व्यक्तिरेखेबद्दल बोलायचे झाले तर पुढे बरेच काही करता येईल. महेशचे अचानक गायब होणे थोडे विचित्र होते. जर पात्रांच्या प्रवासाला वेगळे वळण दिले गेले, जसे वाणी महेशला शेवटचे भेटू इच्छिते, तर ते कृषसाठी देखील एक नवीन पात्र बनू शकते. सिक्वेलबद्दल अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. सर्व काही YRF आणि मोहित सुरीवर अवलंबून आहे की ते यावर पुढे काय करायचे आहे.’

चित्रपट पाहताना माझा एक मित्र रडू लागला 

पुढे त्याने आणिअनीत पड्डाने त्यांच्या पात्रांमधीलइमोशनल कनेक्शन समजून घेण्यासाठी कार्यशाळा घेतल्याचेही सांगितलं. तो म्हणाला “चित्रपटात दाखवले आहे की आम्ही पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो. पडद्यावर अशी केमिस्ट्री दाखवणे आमच्यासाठी सोपे नव्हते. तसेच अशा परिस्थितीत ग्रे शेडच्या भूमिका करणे सोपे नाही. मी खऱ्या आयुष्यात महेशसारखा अजिबात नाही. अनितचा अभिनय पाहून माझा एक मित्र रडू लागला, कारण त्याच्यासोबतही असच काहीसं घडलं होतं. पण सत्य हे आहे की महेशसारखे लोक खऱ्या आयुष्यातही असतात.’

मुलींसोबत वाईट वागण्याची भूमिका करणे…..

तसेच मुलाखतीत शानने चित्रपटातील त्याची भूमिका साकारण्याचा अनुभव आणि एक छोटासा सीन शूट करणे त्याच्यासाठी किती कठीण होते याबद्दल सांगितले होते. तो म्हणाला “मला एका मुलीसोबत नकारात्मक भूमिका करणे फार अवघड वाटतं होते. मी एका गँगस्टर किंवा दहशतवाद्याची निगेटीव्ह भूमिका करू शकतो, पण मुलींसोबत वाईट वागण्याची भूमिका करणे मला जमत नव्हते. पार्टी सीनमध्ये मला अनीतला स्पर्श करायचा होता. त्यासाठी मला 20 टेक लागले. मी अनितला स्पर्श करण्यास कचरत होतो कारण मला तिला नकारात्मक स्पर्श करण जमत नव्हते. मी खऱ्या आयुष्यात महेश सारखा नाही. म्हणून मी चित्रपटात अभिनेत्रीला स्पर्श करताच,मी थरथर कापू लागायचो. माझ्या आत कसली तरी भीती निर्माण व्हायची”

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा