Video | मुंबईतील ‘कोव्हिड वॉरिअर्सं’साठी खाण्याची व्यवस्था, आधी सलमान खानने स्वतः घेतली पदार्थांची चव, पाहा व्हिडीओ…  

| Updated on: Apr 26, 2021 | 11:37 AM

सलमान खानने वांद्रे येथील एका रेस्टॉरंटवर ही जबाबदारी सोपवली होती. तो स्वतः देखील या प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी पोहोचला होता. युवा सेनेचे सदस्य राहुल कनल यांनी ट्विटरवर अभिनेत्याचे फोटो शेअर केले असून यात, तो रेस्टॉरंटमध्ये सगळ्यावर स्वतः लक्ष देताना दिसत आहे.

Video | मुंबईतील ‘कोव्हिड वॉरिअर्सं’साठी खाण्याची व्यवस्था, आधी सलमान खानने स्वतः घेतली पदार्थांची चव, पाहा व्हिडीओ...  
सलमान खान
Follow us on

मुंबई : देशभरात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या वर्षी सलमान खान (Salman Khan) याने कोरोनाशी दोन हात करत असताना गरजूंना अन्नधान्याचे किट आणि पैसे दान केले होते. आता पुन्हा एकदा सलमान मदतीसाठी पुढे आला आहे. रिपोर्टनुसार सलमान खान फ्रंटलाईन कामगारांसाठी फूड किट्स पाठवत आहे. तो सर्वांना या फूड किटचे वाटप करत आहे. युवा सेनेचे नेते राहुल कनल यांनी याबाबत माहिती दिली आहे. राहुल म्हणाले की, सलमान पोलीस अधिकारी, बीएमसी कर्मचारी आणि आरोग्य कर्मचार्‍यांच्या मदतीसाठी पुन्हा एकदा पुढे आला आहे (Salman Khan distribute food to Frontline workers he taste the food to check quality).

इतकेच नव्हे तर, सलमानने स्वतःच्या हाताने हे फूड किट्स वाटप केले आहेत. याआधी त्याचे चक्क स्वतः हे जेवण चव घेऊन पाहिले. अन्नाच्या गुणवत्तेची त्याने विशेष खबरदारी घेतली आहे. या पदार्थांची चव घेत असतानाचा सलमानचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

पाहा व्हिडीओ

व्हिडीओमध्ये आपण मरून शर्ट घातलेल्या सलमान खानला पाहु शकता. या व्हिडीओमध्ये तो स्वत: अन्नाची चव घेत आहे. तसेच, त्याचे पॅकिंग त्यांनी कसे केले आहे, ते देखील पाहिले. मार्गदर्शक सूचना डोळ्यासमोर ठेवून सलमानने जेवणाची चव घेतल्यानंतर लगेच मास्क घातला. त्याच वेळी, संपूर्ण खाद्यपदार्थ तयार करताना कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण केले गेले होते.

सलमान खानने वांद्रे येथील एका रेस्टॉरंटवर ही जबाबदारी सोपवली होती. तो स्वतः देखील या प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी पोहोचला होता. युवा सेनेचे सदस्य राहुल कनल यांनी ट्विटरवर अभिनेत्याचे फोटो शेअर केले असून यात, तो रेस्टॉरंटमध्ये सगळ्यावर स्वतः लक्ष देताना दिसत आहे (Salman Khan distribute food to Frontline workers he taste the food to check quality).

आणखी मदत करणार!

राहुल म्हणाले की, सलमान जे फूड किट देत आहे त्यात मिनरल वॉटर, चहा, बिस्किटे आणि स्नॅक्सचा समावेश आहे. उपमा, पोहे, वडा पाव आणि पावभाजी या पदार्थांचा देखील यात समावेश आहे. पुढे ते म्हणाले, ‘आम्ही मिळून एक हेल्पलाईन नंबर देखील सुरू केला आहे, ज्यावर फ्रंटलाईन कामगार (Frontline Workers) कॉल करू शकतात आणि मदतीसाठी विचारणा करू शकतात. त्यानंतर आम्ही त्यांच्या भागात जाऊन त्यांना मदत करू. त्यांच्या कामाबद्दल धन्यवाद म्हणण्याची ही सलमानची खास शैली आहे. हे सर्व 15 मेपर्यंत सुरू राहणार आहे.’

(Salman Khan distribute food to Frontline workers he taste the food to check quality)

हेही वाचा :

Photo : मालदीव व्हेकेशन इज ओव्हर, दिशा पाटनी आणि टायगर मुंबईत परतले

बॉलिवूडकरांनो आता मालदीव व्हेकेशन ट्रीप विसरा, भारतीयांसाठी मालदीवचे दरवाजे बंद! जाणून घ्या कारण…