
Salman Khan Fathar Salim Khan: बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे अभिनेता सलमान खान सध्या त्याचा आगामी ‘सिकंदर’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सांगायचं झालं तर, आता ‘सिंकदर’ सिनेमामुळे चर्चेत असलेला सलमान खान त्याच्या खसागी आणि कौटुंबिक कारणांमुळे देखील कायम चर्चेत असतो. खान कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. आता देखील सलमान खान याचे वडील सलीम खान त्यांच्या नावामुळे चर्चेत आले आहेत. सलीम खान यांचं नाव शंकर देखील आहे… हे सत्य फक्त खान कुटुंबाच्या जवळच्या व्यक्तींना माहिती आहे.
सलीम खान यांना शंकर नाव कसं पडलं, त्यांना शंकर हे नाव कोणी दिलं? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात तयार झालेच असतील. या गोष्टीचा खुलासा खुद्द सलीम खान यांनी एका मुलाखतीत केला आहे. हिंदू महिला सुशील चरक यांच्यासोबत लग्न केल्यानंतर सलीम खान यांना शंकर हे नाव मिळालं.
सलीम खान यांनी 1964 मध्ये सुशीला चरक यांच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर सलीम खान यांनी दुसरं लग्न 1981 मध्ये हेलन यांच्यासोबत केलं. सुशीला चरक या सलमान खान, अरबाज खान आणि सोहेल खान यांच्या आई आहेत. लग्नानंतर सुशीला चरक सलमा खान झाल्या आणि सलीम खान शंकर झाले. सांगायचं झालं तर, अरबाजच्या शोमध्ये सलीम खान यांनी स्वतःच्या नावाबद्दल मोठा खुलासा केला आहे.
सलीम खान म्हणाले, ‘लग्नानंतर तुझी आई सलमा खान झाली आणि मी शंकर… त्यावेळी फक्त तुझी आजीच एक अशी व्यक्ती होती जिने आम्हाच्या दोघांचं समर्थन केलं होतं. कुटुंबातील इतर सदस्य आमच्या लग्नाच्या विरोधात होता. सलमा मला प्रेमाने शंकर म्हणून बोलायची…’
‘जेव्हा मी तुझ्या आईला भेटायला जायचो तेव्हा त्यांनी मला कधी सलीम म्हणून हाक मारली नाही… नेहमी बोलायची माझा शंकर आला… तुझी आई मला कायम शंकर बोलायची. तेव्हापासून मी सलीमचा शंकर झालो…’ सलीम खान यांच्या नावाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. खान कुटुंबातील जवळच्या व्यक्तींना फक्त सलीम खान यांच्या शंकर या नावाबद्दल माहिती आहे.