AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan याचं सर्वात मोठं सत्य अखेर सर्वांसमोर; प्रसिद्ध अभिनेत्याकडून भाईजनची पोलखोल

सलमान खान याच्याबद्दल 'ही' एक गोष्ट कोणालाच नव्हती माहिती... अनेक वर्षांनंतर भाईजानचं मोठं सत्य समोर... सध्या सर्वत्र सलमान खान याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Salman Khan याचं सर्वात मोठं सत्य अखेर सर्वांसमोर; प्रसिद्ध अभिनेत्याकडून भाईजनची पोलखोल
| Updated on: Aug 09, 2023 | 11:32 AM
Share

मुंबई | 9 ऑगस्ट 2023 : अभिनेता सलमान खान (Salman Khan) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सिनेमे, प्रेम प्रकरणं, वाद… अनेक कारणांमुळे सलमान खान वादाच्या भोवऱ्यात देखील अडकतो. पण आता भाईजान एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. रिऍलिटी शोमध्ये देखील सलमान त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगत असतो. पण बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सलमान खान याच्याबद्दल बोलणं टाळतात. पण सलमान खान याच्याबद्दल अभिनेता जॅकी श्रॉफ, संजय दत्त स्पष्ट बोलताना दिसतात. अशात सलमानकडे ऐकून घेण्याशिवाय कोणताच पर्याय नसतो.. आता देखील सलमान खान याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

सलमान खान याच्या ‘दस का दम’ शोमध्ये जेव्हा जॅकी श्रॉफ, संजय दत्त यांनी हजेरा लावली होती तेव्हा दोन्ही अभिनेते मोठ्या उत्साहाने शूट करत होते. शोमध्ये तिघे त्यांचा मद्यपान करण्याचा अनुभव शेअर करत होते. याच दरम्यान जॅकी श्रॉफ याने सलमान खान याच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. ज्यामुळे जमलेले प्रेक्षक देखील पोट धरुन हसू लागले.

शोमध्ये सलमान खान, संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ दारु प्यायल्यामुळे होणाऱ्या नुकसान आणि फायद्याबद्दल बोलत होते. दस का दम शोच्या एका एपिसोडमध्ये सलमान खान याने भारतात दारूच्या विक्रीबद्दल प्रश्न विचारला. भाईजान म्हणाला, ‘दारु पिऊ नका कारण, दारु डोक्यावरील केसापासून ते पायाच्या नखांपर्यंत आरोग्यास घातक असते..’

यावर संजूबाबा म्हणाला, ‘“दोन पेगच्यावर दारु प्यायची नाही…अजिबात नाही.. दारू हृदयासाठी घातक आहे..’, एवढंच नाही तर संजय दत्त प्रेक्षकांना रेड वाईन पिण्याचा सल्ला देतो. पुढे जॅकी श्रॉफ सलमान खान याची पोलखोल करतो…

जॅकी म्हणतो, ‘सर्वात जास्त पिणारा सांगत आहे, कमी प्या…’ यावर प्रेक्षक देखील पोट धरुन हसू लागतात. अखेर सलमान खान हैराण होतो आणि विषय टाळू लागतो.. सध्या तिघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते देखील व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहेत.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा