Arhaan Khan: लेबनीजचा ‘अडल्ट स्टार’ बनला मलायका अरोराचा मुलगा? वेबसाइट पाहून उडाली भंबेरी; जाणून घ्या काय घडलं

Arhaan Khan: अभिनेत्री मलायका अरोराचा मुलगा अरहान खान सध्या एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या..

Arhaan Khan: लेबनीजचा अडल्ट स्टार बनला मलायका अरोराचा मुलगा? वेबसाइट पाहून उडाली भंबेरी; जाणून घ्या काय घडलं
अरहान खान आणि मलायका अरोरा
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 26, 2026 | 8:52 AM

अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान खान सध्या त्याच्या एका भन्नाट प्रँकमुळे चर्चेत आला आहे. अरहानने त्याच्या युट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या ट्रॅव्हल व्लॉगमध्ये मित्रांनी त्याच्यासोबत केलेल्या या मजेशीर प्रँकचा खुलासा केला आहे. ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये अरहानला काही क्षणांसाठी चांगलाच धक्का बसला. अरहान त्याची आई मलायका अरोरा आणि मित्रांसोबत ग्रीसला गेला होता. याच ट्रिपदरम्यान त्याच्या मित्रांनी त्याच्यासाठी एक प्रँक प्लॅन केला. त्यांनी अरहानच्या काही डीपफेक फोटोंचा वापर करून एक फेक वेबसाइट तयार केली. या वेबसाइटवर अरहानला ‘सनी सुलतान’ नावाचा लेबनीज ओन्लीफॅन्स मॉडेल असल्याचं दाखवण्यात आलं होतं.

मित्रांनीच केला प्रँक

हा प्रँक आणखी खरा वाटावा यासाठी मित्रांनी एका अभिनेत्यालाही पैसे देऊन अरहानला ओळखण्याचं नाटक करण्यास सांगितलं. अरहान रस्त्यावर असताना हा व्यक्ती त्याच्याजवळ आला आणि त्याला ‘सनी सुलतान’ म्हणून हाक मारली. सुरुवातीला अरहानला हा प्रकार समजलाच नाही. मात्र त्या व्यक्तीने फोन काढून सनी सुलतानची फेक वेबसाइट दाखवली. त्या वेबसाइटवर अरहानचे डीपफेक फोटो पाहून तो अक्षरश: हैराण झाला.

विशेष म्हणजे अरहान जिथे जात होता तिथे काही लोक त्याला ‘सनी सुलतान’ म्हणून ओळखत असल्याचं दाखवलं जात होतं. त्यामुळे काही काळासाठी ही गोष्ट खरी असल्याचा त्याला विश्वास बसला. त्याची अवस्था पाहून मित्रांनी अखेर प्रँकचा खुलासा केला. सत्य समजल्यानंतर अरहानने सुटकेचा नि:श्वास सोडला.

पहा व्हिडीओ-

मित्रांनी केलेला हा प्रकार पाहून अरहानची चांगलीच भंबेरी उडाली होती. मात्र सत्य समजल्यानंतर त्यानेही हा प्रकार मजेशीरपणे घेतला. या प्रँकचा व्हिडीओ सोशल मीडियावरही चर्चेत आला असून अनेकांना अरहानसोबतचा हा मजेशीर प्रयोग आवडला आहे. काही चाहत्यांनी तर याचा पार्ट 2 करण्याचीही मागणी केली आहे. अरहान सध्या अभिनयासोबतच कंटेंट क्रिएशन आणि युट्यूबमध्येही सक्रिय आहे. त्याच्या ‘Dumb Biryani’ या चॅनलवर तो मित्र आणि कुटुंबासोबतचे मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतो.

Follow Us