
‘बिग बॉस 19’ सुरू झाल्यापासून तीन आठवडे पूर्ण झाले आहेत. यंदाच्या सिझनमध्ये पहिल्या दिवसापासूनच अभिनेत्री कुनिका सदानंद चर्चेत आहे. तर सूत्रसंचालक सलमान खानसुद्धा तिची बाजू घेतोय, असा आरोप बिग बॉसच्या काही प्रेक्षकांनी केला आहे. गेल्या दोन आठवड्यात घरातून एकही व्यक्ती बाद झाली नाही. त्यामुळे कुनिकाला एविक्शनपासून वाचवलं जातंय, अशीही शंका नेटकऱ्यांना मनात उपस्थित झाली आहे. या चर्चांदरम्यान आता सलमान खानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका पुरस्कार सोहळ्यातील त्याच्या डान्स परफॉर्मन्सचा हा व्हिडीओ आहे. ज्या युजरने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर सलमानचा हा व्हिडीओ शेअर केला आहे, त्याने असा दावा केलाय की व्हिडीओमध्ये सलमानसोबत डान्स करणारी अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून कुनिका सदानंदच आहे.
‘फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्या’त सलमान शर्टलेस होऊन स्टेजवर डान्स करत असतो. तितक्यात काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातलेली एक तरुणी मंचावर येऊन त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. यावेळी ती सलमानसोबत इंडिमेट होण्याचाही प्रयत्न करते. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी स्टेजवरील असा परफॉर्मन्स अत्यंत बोल्ड वाटतो. व्हिडीओ अखेरीस सलमान तिला खांद्यावर उचलून स्टेजवरून निघून जातो. यामध्ये दिसणारी तरुणी कुनिका असल्याचा दावा संबंधित युजरने केला आहे. परंतु यामागचं सत्य वेगळंच आहे.
So now i understand why #SalmanKhan takes #KunickaaSadanand Side 😂❤️#BB19 #BiggBoss pic.twitter.com/dnjZ7zPYqC
— Rubiology 💋 (@ItsRubiology) September 9, 2025
सलमानचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडीओमध्ये सलमानसोबत नाचणारी तरुणी कुनिकाच आहे का, असा सवाल अनेकांनी केला आहे. इतकंच नव्हे तर यामुळेच सलमान आता बिग बॉसमध्ये तिची बाजू घेतोय, असा अंदाज काहींनी वर्तवला आहे. परंतु या व्हिडीओमध्ये दिसणारी तरुणी ही कुनिका नाहीच. तर प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांची पत्नी पोनी वर्मा आहे. पोनी वर्मा ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे.
प्रकाश राज यांच्या खासगी आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहीत असेल. त्यांचा जन्म बेंगळुरूमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. 1994 मध्ये त्यांनी ललिता यांच्याशी लग्न केलं. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. ललिताशी विभक्त झाल्यानंतर त्यांनी वयाने 12 वर्षांनी लहान कोरिओग्राफर पोनी वर्माशी लग्न केलं. पोनीने प्रकाश राज यांच्या एका चित्रपटात कोरिओग्राफर म्हणून काम केलं होतं.