
Salman Khan 8 One Night Stand: अभिनेता सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. वयाच्या 59 व्या वर्षी देखील चाहत्यांमध्ये असलेली सलमान खान याची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही. आजही सलमान खान याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सलमान कायम त्याच्या गर्लफ्रेंड्समुळे चर्चेत असतो. एकदा सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडने मोठा दावा केलेला. सलमानच्या वन नाईट स्टँडला अभिनेत्री वैतागलेली.
सध्या ज्या अभिनेत्रीची आणि भाईजानच्या एक्स गर्लफ्रेंडची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री सोमी अली आहे. एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये सलमान आणि सोमी यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.
ब्रेकअपनंतर सोमी अली हिने सलमान खान याच्या अनेक गंभीर आरोप केले. ज्यामध्ये वन नाईट स्टँड, मानसिक आणि शारीरिक छळ यासारख्या गोष्टींचाही समावेश आहे. दोघांच्या ब्रेकअपला अनेक वर्ष झाली आहेत. पण आजही सलमान – सोमी यांच्या नात्याची चर्चा रंगलेली असते.
सांगायचं झालं तर, एका रेडीट युजरने सोमीला बॉलिवूड सोडण्याचं कारण विचारलं. यावर सोमी म्हणाली, ‘सलमान खानच्या 8 वन नाईट स्टँडला कंटाळली होती. मला दैनंदिन जीवनात शारीरिक आणि शाब्दिक गैरवापर आवडत नाही. मी बॉलिवूड तेव्हा सोडलं जेव्हा माझा बॉयफ्रेंड घरी ऐश नावाच्या मुलीला आणलं होतं. या सर्व गोष्टींना मी कंटाळली होती…’ असं देखील सोमी म्हणाली होती.
सोमी अली असंही म्हणते की सलमान खानसोबतच्या तिच्या नात्याचा तिच्या करीयरवर परिणाम झाला. सोमी अली हिने उन्होंने ‘आंदोलन’, ‘आयो प्यार करें’, ‘यार गद्दार’ आणि ‘कृष्ण अवतार’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं. आता सोमी मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.
सोशल मीडियावर सोमीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.