Vaani Kapoor हिचा पाठलाग करणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीला अभिनेत्रीने शिकवला चांगलाच धडा

Vaani Kapoor हिच्या गाडीचा पाठलाग करणं 'या' व्यक्तीला पडलं महागात; अभिनेत्री घेतलेल्या मोठ्या निर्णयानंतर मात्र...; वाणी कपूर हिच्यासोबत घडलेल्या घटनेची सर्वत्र चर्चा...

Vaani Kapoor हिचा पाठलाग  करणाऱ्या त्या व्यक्तीला अभिनेत्रीने शिकवला चांगलाच धडा
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 03, 2023 | 3:25 PM

Vaani Kapoor : बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींची तगडी फॅन फॉलोइंग आहे. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अशा वेळेस चाहते सेलिब्रिटींच्या प्रायव्हसीची काळजी करत नाहीत. ज्यामुळे सेलिब्रिटी अनेकदा कॅमेऱ्यासमोर नाराजी व्यक्त करतात. काही चाहते असे असतात, जे आपल्या आवडत्या कलाकारा भेटण्यासाठी इच्छा व्यक्त करतात आणि त्यासाठी ते कोणताही मार्ग स्वीकारतात. नुकताच अभिनेता शाहरुख खान याच्या राहत्या घरात ‘मन्नत’ मध्ये २ अज्ञात व्यक्ती घुसले. आता दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

अशी घटना पहिल्यांदाच झालेली नाही. याआधी देखील अशी घटना अभिनेत्री वाणी कपूर हिच्यासोबत घडली आहे. एकदा वाणी हिच्या मागे एक चाहता लागला होता. मोठ्या संकटांचा सामना केल्यानंतर वाणीने त्या चाहत्याविरोधात मोठा निर्णय घेतला. या घटनेमुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली होती.

वाणी कपूर जेव्हा तिच्या कारमधून कामाच्या ठिकाणी जात होती, तेव्हा एक चाहता बाईकवरुन अभिनेत्रीचा पाठलाग करत होता. मागून आपला कोणीतरी पाठलाग करत असल्याचं लक्षात येताच अभिनेत्रीच्या ड्रायव्हरने कारचा वेग वाढवला. त्यानंतर त्या चाहत्याने देखील त्याच्या बाईकचा वेग वाढवला.

 

 

अखेर काही किलोमिटर पुढे गेल्यानंतर चाहत्याने अभिनेत्रीचा पाठलाग करणं बंद केलं. वाणीच्या त्या चाहत्यांचं नाव होतं समीर खान. पण वाणी जेव्हा परत आली समीर पुन्हा अभिनेत्रीचा पाठलाग करु लागला. वाणीने त्या व्यक्तीपासून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या मनात असलेली भीती आणखी वाढली.

अखेर समीर खान विरोधात पोलिसांची मदत घेण्याचा विचार वाणी हिने केला. त्यानंतर वाणीने समीर खान याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर समार खान याने अभिनेत्रीचा पाठलाग करणं बंद केलं. या घटनेला आज अनेक वर्ष झाली असली तरी, अशा घटना सेलिब्रिटींसोबत कायम घडत असतात.

वाणी कपूर हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने, अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या ‘शुद्ध देसी रोमान्स’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ज्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. पहिल्या सिनेमानंतर वाणी बेफिक्रे, वॉर आणि बेल बॉटम सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसली.

वाणी कपूर ‘शमशेरा’ सिनेमात देखील दिसली. ‘शमशेरा’ सिनेमात वाणी कपूर हिने अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत स्क्रिन शेअर केली. वाणी मोठ्या पडद्यासोबतच सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर वाणी कपूर हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.