
‘बिग बॉस’ आणि सलमानसोबत झळकलेली अभिनेत्री सना खानने काही वर्षांपूर्वी अचानक अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तिने मुफ्ती अनस सय्यदशी निकाह केला. या दोघांना आता दोन मुलं आहेत. सना आता सोशल मीडियाद्वारे तिच्या धर्माचा प्रचार-प्रसार करताना दिसते. अभिनयक्षेत्रात काम करताना सना ही प्रसिद्ध डान्सर मेल्विन लुईसला डेट करत होती. मात्र जेव्हा या दोघांचा ब्रेकअप झाला, तेव्हा तिने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत त्याची पोलखोल केली होती. 2020 मध्ये इन्स्टाग्राम अकाऊंटवर लाइव्ह येत सनाने मेल्विनवर धक्कादायक आरोप केले होते.
इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये सना म्हणाली होती, “मेल्विन हा अत्यंत खोटारडा आणि फसवणूक करणारा मुलगा आहे. त्याने एका 18 वर्षीय मुलीला प्रेग्नंट केलं होतं. तिला तो ड्रग्जसुद्धा द्यायचा. त्याने बऱ्याच मुलींकडून पैसे घेतले होते. इतकंच काय तर तो त्याच्या विद्यार्थिनींसोबतसुद्धा फ्लर्ट करायचा.” एका मुलाखतीत सनाने मेल्विनवर मारहाणीचेही आरोप केले होते. ‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सना म्हणाली, “माझ्याकडे पुरावे आहेत, त्याने मला खूप मारलं होतं. माझ्या डोक्यावर त्याने वार केले होते. माझ्या चेहऱ्यावरही जखमा होत्या. त्याने मला शिवीगाळ केली. मी सतत रडत बसायची. मेल्विनचा खरा चेहरा ओळखायला मला वर्षभराचा काळ लागला.” सनाच्या या आरोपांना नंतर मेल्विनने फेटाळले होते.
सना खान अत्यंत कमी वयात ग्लॅमर विश्वात काम करू लागली होती. तिने वयाच्या 18 व्या वर्षी मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली होती. तिने तिच्या करिअरमध्ये पाच विविध भाषांमधील 18 चित्रपटांमध्ये काम केलंय. तर 50 पेक्षा जास्त जाहिरातींमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. सना खान ‘बिग बॉस’च्या सहाव्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. सना आणि मेल्विन हे जवळपास वर्षभर एकमेकांना डेट करत होते. त्यावेळी ते सोशल मीडियावर सतत एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करायचे. या दोघांच्या रिलेशनशिपपेक्षा त्यांच्या ब्रेकअपने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.