‘पान सिंह तोमर’ फेम सेलिब्रिटीचं वयाच्या ६२ व्या वर्षी निधन; दुपारी होणार अंत्यसंस्कार

वयाच्या ६२ व्या वर्षी ‘पान सिंह तोमर’ फेम सेलिब्रिटीचं निधन; गंभीर आजाराने होते त्रस्त

‘पान सिंह तोमर’ फेम सेलिब्रिटीचं वयाच्या ६२ व्या वर्षी निधन; दुपारी होणार अंत्यसंस्कार
‘पान सिंह तोमर’ फेम सेलिब्रिटीचं वयाच्या ६२ व्या वर्षी निधन; दुपारी होणार अंत्यसंस्कार
| Updated on: Jan 13, 2023 | 8:41 AM

Sanjay Chouhan Passed Away: ‘पान सिंह तोमर’ आणि ‘आय एम कलाम’ यांसारख्या सिनेमांचं लेखण करणाऱ्या संजय चौहान (Sanjay Chouhan) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून संजय चौहान किडनीच्या त्रासाने त्रस्त होते. अनेक सिनेमांचं लेखण केलेल्या कलाकाराचं अचानक निधन झाल्यामुळे कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. संजय चौहान यांनी तिग्मांशु धूलिया यांच्यासोबत ‘साहेब बीवी गँगस्टर’ या सिनेमाचं देखील लेखण केलं होतं. (Indian screenwriter in Hindi cinema)

संजय चौहान यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी सरीता आणि मुलगी सारा आहे. संजय चौहान यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. शिवाय त्यांच्या कामाची पोचपावती देखील त्यांना मिळाली. २०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘आय एम कलाम’ सिनेमाला फिल्मफेअर अवॉर्डने सन्मानित देखील करण्यात आलं होतं.

‘आय एम कलाम’ सिनेमासोबत संजन चौहान यांच्या ‘मैंने गांधी को नहीं मारा’ आणि ‘धूप’ या दोन सिनेमांचं देखील प्रचंड कौतुक झालं. संजय चौहान यांच्या निधनाने बॉलिवूडचं मोठं नुकसान झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. सध्या अनेक सेलिब्रिटी संजय चौहाण यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत.

संजय यांनी दिल्लीतून पत्रकार म्हणून आपल्या कामगिरीची सुरुवात केली. त्यानंतर १९९० साली संजय यांनी सोनी टीव्हीवरील क्राईमवर आधारित ‘भंवर’ सीरिजचं लेखण केल्यानंतर मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर संजय यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

मुंबईत आल्यानंतर सुधीर मिश्रा यांच्या योगदानाने २००३ साली प्रदर्शित झालेल्या ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’ सिनेमासाठी संजय यांनी डायलॉग लिहिले. आपल्य कामामुळे कायम चर्चेत राहिलेले संजय यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहे. शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता मुंबईच्या ओशिवारा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.