अवघ्या चार महिन्यात संजय दत्तच्या व्हिस्की ब्रँडवर लोक तुटून पडले; वेड्यासारखी खरेदी, 10 लाख बॉटल्सची विक्री, ब्रँडचं नाव काय?

संजय दत्तच्या 'या' व्हिस्की ब्रँडने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. अवघ्या चार महिन्यांत 10 लाखांहून अधिक बाटल्या विकून या ब्रँडने विक्रीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. हा ब्रँड जगभरात लोकप्रिय झाला आहे. एवढंच नाही तर या ब्रँडला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. संजय दत्तच्या या व्हिस्की ब्रँडमध्ये असं काय विशेष आहे?

अवघ्या चार महिन्यात संजय दत्तच्या व्हिस्की ब्रँडवर लोक तुटून पडले; वेड्यासारखी खरेदी, 10 लाख बॉटल्सची विक्री, ब्रँडचं नाव काय?
Sanjay Dutt Glenwalk Whiskey, 1 million bottles sold in 4 months, why is whiskey so popular globally
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 28, 2025 | 3:31 PM

अनेक असे सेलिब्रिटी आहेत ज्यांचे स्वत:चे व्यवसाय आहे. अनेकांचे बार-रेस्टॉरंट आहे. तर अनेकांच्या विविध कंपन्या आहेत. असाच एक अभिनेता आहे ज्याचा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर व्यवसायामध्ये देखील दबादबा आहे. आणि तो अभिनेता म्हणजे बॉलिवूडचा खलनायक संजय दत्त अर्थातच संजू बाबा.

10 लाखांहून अधिक बाटल्या विकल्या गेल्या

ब्रँडची हवा फक्त भारतातच नाहीतर, संपूर्म जगभरात पसरली आहे. सह-संस्थापक स्कॉच व्हिस्की ब्रँड ‘द ग्लेनवॉक’ ने अवघ्या चार महिन्यांत संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाला आहे. फक्त चार महिन्यातच जवळपास 10 लाखांहून अधिक बाटल्या विकल्या गेल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही विक्री पाच पट जास्त असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. 2024 मध्ये, याच काळात, 2 ते 3 लाख बाटल्या विकल्या गेल्या. या वर्षी विक्रीने विक्रम मोडले आहेत. हा आकडा सप्टेंबर महिन्याचा आहे.

संजू बाबाच्या स्कॉचची जादू

संजू बाबाच्या को-फाऊंड स्कॉच व्हिस्की ब्रँड ‘द ग्लेनवॉक’नं अवघ्या चार महिन्यांतच जगभरात प्रसिद्ध झाला आहे. एका वृत्तानुसार ‘द ग्लेनवॉक’ हे कार्टेल ब्रदर्सने तयार केलं आहे , ही कंपनी संजय दत्त आणि मोक्ष सानी, जितिन मेरानी, ​​रोहन निहलानी आणि मनीष सानी यांनी मिळून सह-स्थापना केली आहे. ही एक प्रीमियम ब्लेंडेड स्कॉच व्हिस्की आहे जी स्कॉटलंडमध्ये तीन वर्षांपासून वापरली जाते. एवढंच नाही तर ही व्हिस्की जगातील टॉप 3 व्हिस्की मॅन्युफॅक्चरर्सपैकी एकाने उत्पादित केली आहे.

व्हिस्कीची वैशिष्ट्ये काय आहेत?

या व्हिस्कीची वैशिष्ट्याबद्दल बोलायचं झालं तर उत्तम क्वॉलिटी, स्मूद फ्लेवर्स आणि परवडणारी किंमती. म्हणूनच ही व्हिस्की वेगाने लोकप्रिय होत आहे. संजय दत्तने या यशाबद्दल भाष्य करताना म्हटलंय की, ‘द ग्लेनवॉक’ची ग्रोथ, मोटिवेट करणारी आहे. अनेक ब्रँड्सना जे साध्य करायला दशकं लागतात, ते संजू बाबाच्या ब्रँडनं फक्त दोनच वर्षात साध्य केलंय. मेहनत आणि प्रोडक्टच्या क्वालिटीमुळे हा टप्पा गाठणे शक्य झाल्याचं त्याने म्हटलं आहे.

जगभरात व्हिस्कीचा ब्रँड प्रसिद्ध 

दोन वर्षांपूर्वी लाँच झालेला हा ब्रँड आता 15 भारतीय राज्यांमध्ये आणि चार आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहे. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युएईमध्ये हा ब्रँड प्रसिद्ध आहे. भारतातील त्याची सर्वात मोठी बाजारपेठ महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, कर्नाटक आणि तामिळनाडू आहे. या ब्रँडने 30 हून अधिक वितरकांसोबत भागीदारी केली आहे आणि आता दहा हजारांहून अधिक रिटेल आउटलेट्स आणि 24 ड्युटी-फ्री स्टोअर्समध्ये विकली जाते. याव्यतिरिक्त, ‘द ग्लेनवॉक’ने 10 हून अधिक आंतरराष्ट्रीय व्हिस्की पुरस्कार आणि कित्येक बिजनेस ऑनर्स जिंकले आहेत.कंपनी लवकरच दोन नवीन रेंज लॉन्च करणार आहे. 5-इयर-ओल्ड आणि इयर-ओल्ड एक्सप्रेशन्स असे हे दोन रेंज लॉन्च करणार आहेत.