संजय-माधुरीचं सर्वात सुपरहिट गाणं, 2026 मधील चित्रपटात पुन्हा वापरलं, बनत आहेत लाखो रील्स

संजय दत्त माधुरी दीक्षितचं 36 वर्षांपूर्वीचं सर्वात सुपरहिट गाणं, बप्पी लहरी यांच्या आवाजामुळे ठरलं लोकप्रिय. आजही Gen-Z आणि Millennials या गाण्यावर बनवतं आहेत जबरदस्त रील्स.

संजय-माधुरीचं सर्वात सुपरहिट गाणं, 2026 मधील चित्रपटात पुन्हा वापरलं, बनत आहेत लाखो रील्स
Tamma Tamma Loge
| Updated on: Oct 01, 2026 | 2:50 PM

काही गाणी अशी असतात, ज्यांची धून कानावर पडताच नकळत पाय थिरकू लागतात. असंच एक गाजलेलं गाणं म्हणजे ‘तम्मा तम्मा लोगे’. 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘थानेदार’ या चित्रपटातील हे गाणं आजही प्रेक्षकांच्या चांगलंच लक्षात आहे. संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याने त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. आता 2026 मध्ये ‘धुरंधर: द रिवेंज’मध्ये या गाण्याची धून नव्या अंदाजात ऐकायला मिळाल्याने पुन्हा एकदा ‘तम्मा तम्मा’ गाणं चर्चेत आलं आहे.

‘तम्मा तम्मा लोगे’ हे ‘थानेदार’ चित्रपटातील लोकप्रिय गाणं आहे. राज एन. सिप्पी दिग्दर्शित या चित्रपटात जितेंद्र, जया प्रदा, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या प्रमुख भूमिका होत्या. संजय दत्तने बिरजू, तर माधुरी दीक्षितने चंदाची भूमिका साकारली होती. अॅक्शन-ड्रामा असलेल्या या चित्रपटाची गाणी त्याकाळी विशेष गाजली होती.

Loading...

बप्पी लहिरी आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजाची जादू

‘तम्मा तम्मा लोगे’ हे गाणं बप्पी लहिरी आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलं होतं. गाण्याचे बोल इंदीवर यांनी लिहिले होते, तर त्याची कोरिओग्राफी प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी केली होती. गाण्याचे वेगळे बीट्स, हटके डान्स स्टेप्स आणि संजय दत्त-माधुरी दीक्षित यांची जोडी यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं.

या गाण्याच्या संगीतावर गिनीचे प्रसिद्ध संगीतकार मोरी कांटे यांच्या ‘तमा’ आणि ‘ये के ये के’ या गाण्यांचा प्रभाव असल्याचं सांगितलं जातं. गाण्याच्या शूटिंगदरम्यान संजय दत्तला डान्स स्टेप्स परफेक्ट करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली होती. सरोज खान यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक टेकनंतर गाणं पूर्ण करण्यात आलं. विशेष म्हणजे गाण्यात खुर्च्यांसोबत केलेला डान्सही त्यावेळी चांगलाच चर्चेत आला होता.

‘धुरंधर: द रिवेंज’मध्ये जुन्या गाण्याला नवा अंदाज

आता तब्बल तीन दशकांहून अधिक काळानंतर ‘तम्मा तम्मा’ पुन्हा एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर आलं आहे. 2026 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर: द रिवेंज’मध्ये या जुन्या गाण्याला नव्या म्युझिक ट्रीटमेंटसह वापरण्यात आलं आहे. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक शाश्वत सचदेव आहेत आणि अधिकृत साउंडट्रॅकमध्ये ‘तम्मा तम्मा’ हे गाणं बप्पी लहिरी आणि अनुराधा पौडवाल यांच्या नावाने समाविष्ट करण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे, या चित्रपटात संजय दत्तच्या चौधरी असलम या व्यक्तिरेखेशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रसंगात ही जुनी धून ऐकायला मिळते. त्यामुळे 1990 मध्ये संजय दत्त आणि माधुरी दीक्षितवर चित्रित झालेल्या गाण्याची धून अनेक वर्षांनी पुन्हा संजय दत्तसोबतच एका वेगळ्या पार्श्वभूमीवर ऐकू आली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us