
12 जूनच्या रात्री करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूरचे निधन झाल्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. पोलो खेळताना संजय कपूरचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान त्याच्या एक दिवसापूर्वीच पोलो क्लबकडून संजय कपूरचा शेवटचा फोटो शेअर करण्यात आला होता. अभिनेत्री करिश्मा कपूरने 2016 मध्ये संजय कपूरला घटस्फोट दिला होता मात्र. करिश्मासोबत राहणाऱ्या त्यांच्या मुलांमुळे दोघे भेटत होते त्यामुळे संजय कपूरचे निधन हा करीश्मासाठी देखील फारच धक्का देणारी बातमी आहे.
क्लबच्या इंस्टाग्राम पेजवर संजय कपूरचा शेवटचा फोटो
दिल्लीतील उद्योगपती संजय कपूर बहुतेक वेळा यूकेमध्ये राहत होता. येथे तो गार्ड्स पोलो क्लबमध्ये सुजान इंडियन टायगर्स पोलो टीममध्ये सामील झाला होता आणि त्याची संपूर्ण टीमशी चांगली मैत्री होती. संजय अनेकदा त्यांच्यासोबत पोलो खेळायला जायचा. या क्लबच्या इंस्टाग्राम पेजवर संजय कपूरचा शेवटचा हसरा फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यासोबत एक लांब पोस्ट देखील लिहिली आहे. या फोटोमध्ये सुजान इंडियन टायगर्सचे मालक देखील दिसत आहेत.
संजय कपूरच्या स्मरणार्थ कार्टियर ट्रॉफीचा अंतिम सामना
हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘आज आपण आपल्या प्रिय मित्र संजय कपूरच्या स्मरणार्थ कार्टियर ट्रॉफीचा अंतिम सामना खेळणार आहोत, ज्याचे काही दिवसांपूर्वी मैदानावर दुःखद निधन झाले. आमचे कर्णधार आणि मार्गदर्शक, जैसल सिंग संघासोबत त्यांचा जुना मित्र संजय कूपर यांच्या सन्मानार्थ एक मिनिट मौन पाळतील आणि नंतर आदर म्हणून बाहेर बसतील. संजय आणि जैसलचा हा फोटो काही दिवसांपूर्वी सेमीफायनल खेळण्यासाठी तयार होण्यापूर्वी काढला होता. RIP संजय, तुझी कायमच आठवण राहिल, या क्लबसाठी तूझे योगदान नेहमीच लक्षात राहील.’
करिश्मा कपूर आणि संजय कपूर कधी वेगळे झाले?
2003 मध्ये करिश्मा कपूरने संजय कपूरशी लग्न केले होते. त्यांना समायरा आणि कियान ही दोन मुले आहेत जी त्यांच्या घटस्फोटानंतर करिश्मासोबत राहतात. घटस्फोटानंतर संजय कपूरने प्रिया सचदेवशी लग्न केले, जिच्यापासून तिला एक मुलगी देखील आहे. वृत्तानुसार, करिश्मा कपूरपूर्वी संजय कपूरने 1996 मध्ये नंदिता महतानीशी लग्न केले होते, पण ते 2000 मध्ये वेगळे झाले.