
मुंबई : लग्न, रोमांस, घटस्फोट… पती – पतीच्या नात्याभोवती फिरणारा ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सिनेमात अभिनेता विकी कौशल आणि आणि अभिनेत्री सारा अली खान एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. सध्या सर्वत्र विकी आणि सारा यांच्या जरा हटके जरा बचके सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा रंगत आहे. ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमात सारा आणि विकी यांच्यातील रोमाँटिक केमेस्ट्री चाहत्यांना अनुभवता येणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत…
सारा अली खान आणि विकी कौशल स्टारर ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले असून दिनेश विजन आणि ज्योती देशपांडे यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमात विकी कौशल कपिल या भूमिकेत दिसणार आहे, तर सारा सौम्या ही भूमिका साकारताना दिसणार आहे… ‘जरा हटके जरा बचके’ २ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘जरा हटके जरा बचके’ सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सिनेमाबद्दलची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे. ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमाची कथा इंदूरमधील मध्यमवर्गीय जोडप्यावर आधारित आहे. कपिल आणि सौम्या कॉलेजमध्ये असताना एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यानंतर कुटुंबियांच्या संमतीने दोघांचे लग्न होतं…
पण लग्नानंतर दोघांचं नातं वेगळं वळण घेतं. लग्नानंतर कपिल आणि सौम्या यांच्यातील वाद वाढू लागतात. अखेर दोघे घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात. महत्त्वाचं म्हणजे ट्रेलरमध्ये कपिल आणि सौम्या एकांतात प्रेम करताना आणि दुसरीकडे कुटुंबासमोर भांडताना दिसत आहेत. त्यामुळे सिनेमाच्या कथेमध्ये काय ट्विस्ट आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनी २ जून पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
‘जरा हटके जरा बचके’ सिनेमात सारा आणि विकी यांच्यासोबत राकेश बेदी, शारिब हाश्मी, नीरज सूद यांसारखे अनेक दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सध्या सर्वत्र सारा आणि विकी स्टारर ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा रंगत आहे..