तिने या सर्व बेकायदेशीर, हराम गोष्टी केल्या..; अभिनेत्रीने केदारनाथचं दर्शन घेतल्यानंतर मौलानांनी जारी केला फतवा

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने केदारनाथ मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर नवा वाद सुरू झाला आहे. इस्लाम धर्माची असतानाही तिने मंदिरात जाऊन पूजा केल्याबद्दल मौलानांनी फतवा जारी केला आहे.

तिने या सर्व बेकायदेशीर, हराम गोष्टी केल्या..; अभिनेत्रीने केदारनाथचं दर्शन घेतल्यानंतर मौलानांनी जारी केला फतवा
अभिनेत्री
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 30, 2026 | 9:41 AM

अभिनेत्री सारा अली खान सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतीच सारा उत्तराखंडमधील प्रसिद्ध केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी पोहोचली होती. मात्र, तिची ही धार्मिक यात्रा आता वादाचा विषय ठरली आहे. उत्तर प्रदेशातील एका मुस्लिम धर्मगुरूंनी साराच्या मंदिरात जाऊन पूजा-अर्चना करण्यावर आक्षेप घेत तिच्याविरोधात फतवा जारी केला आहे. तसंच तिने अल्लाहची माफी मागावी, असंही म्हटलं आहे. साराच्या केदारनाथ दर्शनामुळे सोशल मीडियासह मनोरंजन विश्वात चर्चेला उधाण आलं आहे.

केदारनाथमध्ये पूजा केल्यामुळे मौलानांचा आक्षेप

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बरेली इथल्या मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी सारा अली खानच्या केदारनाथ मंदिर भेटीवर आक्षेप घेतला आहे. सारा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केदारनाथला भेट देत आहे. यावेळीही तिने मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि पूजा-अर्चना केली. मात्र, एका मुस्लिम व्यक्तीने दुसऱ्या धर्माच्या धार्मिक स्थळी जाऊन पूजा करणं शरीयतनुसार योग्य नसल्याचं मौलानांनी म्हटलं आहे.

Loading...

यासंदर्भात त्यांनी एक व्हिडीओ जारी करत आपली भूमिका मांडली. इस्लाम आणि शरीयतच्या दृष्टीने मंदिरात पूजा करणं योग्य नसून ते निषिद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच साराने आपल्या कृतीबद्दल अल्लाहकडे माफी मागावी आणि तौबा करावी, असंही म्हटलं आहे. काही तरुणांनी साराच्या केदारनाथ भेटीबाबत आपल्याला प्रश्न विचारले होते. त्यावर आपण हे स्पष्टीकरण दिल्याचं मौलानांनी सांगितलं.

पहा फोटो-

सारा अली खानचं केदारनाथशी खास नातं

सारा अली खान आणि केदारनाथ मंदिराचं एक खास नातं आहे. अभिनेत्री अनेकदा सोशल मीडियावर केदारनाथ यात्रेचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. विशेष म्हणजे, तिच्या पहिल्या चित्रपटाचं नावही ‘केदारनाथ’ होतं. या चित्रपटात तिने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत काम केलं होतं. 2017 मध्ये सारा पहिल्यांदा केदारनाथला गेली होती. त्यानंतरही ती अनेकदा या ठिकाणी दर्शनासाठी पोहोचली आहे. यापूर्वी ती अभिनेत्री जान्हवी कपूरसोबतही केदारनाथला गेली होती. केदारनाथसोबतच साराने काशी विश्वनाथ मंदिर आणि उज्जैन इथल्या महाकालेश्वर मंदिरातही दर्शन घेतलं आहे. त्यामुळे विविध धार्मिक स्थळांना भेट देण्याची तिची आवड अनेकदा चर्चेत आली आहे.

दरम्यान, केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरांमध्ये बिगर हिंदू व्यक्तींच्या प्रवेशाबाबतही काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने बिगर सनातनी भाविकांसाठी मंदिरात दर्शन आणि पूजा करण्यापूर्वी प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करण्याची अट घातली आहे. सारा अली खानच्या टीमनेही तिच्या भेटीपूर्वी आवश्यक प्रतिज्ञापत्र सादर केल्याची माहिती मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोहन सिंह रांगड यांनी दिल्याचं वृत्त आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us