
Sara Ali Khan Love Life: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या ‘स्काय फोर्स’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात सारा हिची फार खास अशी भूमिका नाही. पण आता सारा तिच्या सिनेमामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सारा अली खान एका भाजप नेत्याच्या मुलाला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर साराने अधिकृत घोषणा केलेली नाही. पण दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता देखील सारा रूमर्ड बॉयफ्रेंड अर्जुन प्रताप बाजवा याच्यासोबत असल्याची माहिती समोर येत आहे.
सध्या सोशल मीडियावर सारा अली खान आणि अर्जुन बाजवा यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. दोघांचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ गोवा येथील असल्याचं देखील सांगितलं जात आहे. जेथे दोघेही सुट्टयांचा आनंद घेताना दिसत आहे. व्हिडीओ एका कॅफेमध्ये शूट करण्यात आल्याचं कळत आहे. पण व्हिडीओमध्ये अशी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
सारा अली खान आणि अर्जुन बाजवा यांच्या व्हिडीओ नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी फोटोंवर कमेंट करत म्हणाला, ‘सारा अली खानच्या आयुष्यत अशी एक व्यक्ती हवी जी कायम तिच्यासोबत राहिल. कार्तिक आर्यन नाही… जो कायम स्वतःचा विचार करेल…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘हा अर्जुन बाजवा कोण आहे?’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘हा तर तोच मुलगा आहे ज्याच्यासोबत सारा केदारनाथ येथे गेली होती.’
कायम सारा अली खान हिच्यासोबत दिसणाऱ्या व्यक्तीचं पूर्ण नाव अर्जुन प्रताप बाजवा आहे. अर्जुन अभिनेता आणि मॉडेल आहे. अर्जुन हा भाजप नेते फतेह जंग सिंग बाजवा यांचा मुलगा आहे. फतेह जंगसिंग बाजवा हे पंजाबमधील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उपाध्यक्ष आहेत. यापूर्वी ते काँग्रेसचे आमदारही राहिले आहेत.
अर्जुन बाजवा देखील MMA फायटर आहे. ‘सिंग इज ब्लिंग’ सारख्या सिनेमा अर्जुनने सहाय्यक भूमिका केल्या आहेत. अर्जुनने 2019 मध्ये पंजाबच्या जिल्हा परिषदेचा सर्वात तरुण सदस्य म्हणून काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व केलं. सोशल मीडियावर देखील अर्जुन कायम सक्रिय असतो.