2 वर्षांपासून मी प्रेग्नंटच.., अभिनेत्री कोणावर भडकली? थेट दिला सल्ला

सरगुन आणि रवी हे '12/24 करोल बाग' या मालिकेत एकत्र काम करताना एकमेकांच्या प्रेमात पडले. अनेक वर्षे डेट केल्यानंतर या दोघांनी 7 डिसेंबर 2013 रोजी लग्न केलं. लग्नानंतर अनेकदा सरगुनच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलं आहे.

2 वर्षांपासून मी प्रेग्नंटच.., अभिनेत्री कोणावर भडकली? थेट दिला सल्ला
Sargun Mehta
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 22, 2026 | 12:20 PM

अभिनेत्री सरगुन मेहता सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. यामागचं कारण म्हणजे तिच्या प्रेग्नंसीबद्दलचे वृत्त. रवी दुबे आणि सरगुन मेहता लवकरच आई-बाबा होणार असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर आता तिने प्रतिक्रिया दिली आहे. लग्नाच्या 13 वर्षांनंतर सरगुन प्रेग्नंट असल्याच्या जोरदार चर्चा असताना आता अभिनेत्रीने रागाच्या भरात इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. लोकांसाठी गेल्या दोन वर्षांपासून मी गरोदरच आहे, असं तिने या पोस्टमध्ये लिहिलंय. त्याचप्रमाणे अशाप्रकारचं वृत्त पसरवण्याआधी मला किंवा माझ्या टीमला एकदा विचारा, असंही तिने माध्यमांना म्हटलंय. रवी आणि सरगुन ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय जोडी आहे.

शनिवारी सरगुन मेहताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत प्रेग्नंसीच्या अफवांना फेटाळलं. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा होती की सरगुन आणि रवी दुबे यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. आता सरगुनने अत्यंत कठोर शब्दांत या चर्चांवर उत्तर दिलं आहे. त्याचसोबत सतत प्रेग्नंसीवरून चर्चा करणाऱ्या लोकांना तिने शांत राहण्याचा आणि अशा निराधार अफवा न पसरवण्याचा सल्ला दिला आहे.

‘तुम्हाला त्या प्रेग्नंसीबद्दल कसं समजलं ज्याबद्दल मला आणि रवीलाच अजून माहीत नाही? आता पुरे झालं.. प्लीज (हात जोडलेला इमोजी) असं वाटतंय वृत्तांना आमच्याही आधी आमच्या प्रेग्नंसीबद्दल समजलं होतं, जी प्रेग्नंसी गेल्या दोन वर्षांपासून सुरूच आहे. त्यांच्या मते मी गरोदर आहे. ही तर सर्वाधिक काळ चाललेली प्रेग्नंसी असेल. कृपया शांत व्हा आणि अशा तथ्यहीन बातम्या पसरवणं बंद करा. हे वृत्त खरं आहे खोटं हे कृपया मला किंवा माझ्या टीमला एकदा छापण्यापूर्वी विचारा तरी’, अशा शब्दांत तिने ट्रोलर्सवर राग व्यक्त केला आहे.

सरगुनने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर नाराजी व्यक्त करणारी पोस्ट लिहिली आहे. ‘ही मुलं कुठे जात आहेत आणि किती लवकर मी त्यांना जन्म देतेय? मी हे प्रश्न विचारायला हवेत का, की गेल्या दोन वर्षांपासून किंवा त्यापेक्षाही अधिक काळापासून प्रेग्नंट आहे? त्यांना माझ्या डॉक्टरांबद्दल माहित आहे का? सलून किंवा कॅफे जाणंही हल्ली प्रेग्नंसीचं लक्षण मानलं जातंय का’, असे उपरोधिक सवाल तिने केले आहेत.

एका मुलाखतीत या सततच्या अफवांवर सरगुन म्हणाली होती, “कोणत्याही विवाहित जोडप्याकडून फक्त या एकाच गोष्टीची अपेक्षा केली जाते. जर ही एकमेव गोष्टच आम्हाला करायची असेल, तर संपूर्ण लग्नसंस्थेलाच कमीपणा दाखवल्यासारखं होईल. ज्या महिला प्रेग्नंट होत आहेत किंवा ज्यांना मूल हवंय.. ते चुकीचे आहेत असं मी म्हणत नाही. पण लोकांचे आयुष्यात प्राधान्यक्रम वेगवेगळे असतात. काहींना 25 व्या वर्षीच ते सुख मिळतं, तर काही जण 40 व्या वर्षी आई-बाबा बनतात.”