Satish Kaushik : कुटुंबासाठी कोट्यवधींची संपत्ती मागे सोडून गेले सतीश कौशिक

| Updated on: Mar 09, 2023 | 10:31 AM

अभिनेत्याच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचं डोंगर..., निधनानंतर पत्नी आणि लेकीसाठी कोट्यवधींची संपत्ती मागे सोडून गेले सतीश कौशिक; त्यांच्या संपत्तीचा आकडा थक्क करणारा...

Satish Kaushik : कुटुंबासाठी कोट्यवधींची संपत्ती मागे सोडून गेले सतीश कौशिक
सतीश कौशिक आणि त्यांचे कुटुंबीय
Follow us on

Satish Kaushik net worth : आपल्या अभिनयाने सर्वांना पोट धरुन हसवणारे अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक आता मात्र चाहत्यांना रडवून दुसऱ्या विश्वात गेले आहेत. सतीश कौशिक यांना वयाच्या ६६ व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचं निधन झालं आहे. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सतीश यांना गुरुग्राम येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान सतीश कौशिक यांचं निधन झालं. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर मात्र दुःखाचा
डोंगर कोसळला आहे. सतीश कौशिक पत्नी शशी कौशिक आणि मुलगी वंशिका कौशिक यांना सोडून गेले आहेत. पण कुटुंबासाठी सतीश कौशिक यांनी कोट्यवधींची संपत्ती मागे ठेवली आहे.

सतीश कौशिक यांनी सिनेविश्वात तीन दशक मोलाचं योगदान दिलं. अभिनयापासून ते दिग्दर्शनापर्यंत त्यांनी काम केलं. मिळालेल्या माहितीनुसार २०२३ मध्ये सतीश कौशिक यांची एकूण संपत्ती ४० कोटी रुपये इकती आहे. अभिनयातून सतीश कौशिक यांनी कोट्यवधींचं संपत्ती कमावली आहे. त्यांच्या निधनानंतर कुटुंब मात्र दुःखात आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

बॉलिवूडमध्ये सतीश कौशिक यांनी अनेक वर्ष काम केलं. त्यांनी ‘मौसम’ सिनेमातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम सुरु केलं. अभिनेते, दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात देखील सतीश कौशिक यांनी मोलाची कामगिरी केली. आपल्या विनोदबुद्धीने त्यांनी अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सतीश कौशिक यांनी जवळपास १०० सिनेमांमध्ये काम केलं.

सतीश कौशिक यांचं पार्थिव शरीर सध्या गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. आता त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी दिल्लीतील दीनदयाल रुग्णालयात नेण्यात येणार आहे. जिथे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश कौशिक यांचं पार्थिव शरीर मुंबई येथे आणण्यात येणार आहे. सतिश कौशिक यांच्यावर गुरुवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळत आहे. शवविच्छेदनानंतर सतीश कौशिक यांचा मृतदेह मुंबईमध्ये आणणार आहे.

अनुपम खेर यांचं ट्विट

अनुपम खेर यांनी ट्विट करून सतिश कौशिक यांच्या निधनाची बातमी दिली. तसेच आपल्या मित्राबद्दलची भावनाही व्यक्त केली. मृत्यू हे या जगाचं अंतिम सत्य आहे. हे मला माहीत आहे. पण माझ्या हयातीत माझा अत्यंत जवळचा मित्र सतीश कौशिक बाबत मी ही गोष्ट लिहील याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. आमच्या 45 वर्षाच्या मैत्रीला अचानक असा पूर्णविराम लागला आहे. हरी ओम शांती. आता सतिश शिवाय आयुष्य पुन्हा पूर्वी सारखं राहणार नाही, असं अनुपम खेर म्हणाले.