‘घरी जेवण करत असताना…’ सतीश शहांच्या निधनाचं खरं कारण समोर; किडनी फेलमुळे नाही तर या कारणामुळे मृत्यू, जवळच्या व्यक्तीने केला खुलासा

अभिनेते सतीश शाह यांच्या निधनाचे खरे कारण समोर आले आहे. सुरुवातीला किडनी निकामी झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त होते, परंतु त्यांच्या जवळच्या मित्राने याबाबत खुलासा केला आहे. शाह यांची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती आणि प्रकृती स्थिर होती. मात्र त्यामुळे त्यांच्या निधनाचे कारण हे किडनी निकामी झाल्यामुळे झाल्याचे नव्हते.

घरी जेवण करत असताना... सतीश शहांच्या निधनाचं खरं कारण समोर; किडनी फेलमुळे नाही तर या कारणामुळे मृत्यू, जवळच्या व्यक्तीने केला खुलासा
Satish Shah died of heart attack, not kidney failure, reveals Rajesh Kumar
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 28, 2025 | 6:54 PM

अभिनेता सतीश शाह यांच्या निधनाच्या धक्क्यातून बॉलिवूड जगत अद्याप सावरलेले नाही. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला. सुरुवातीच्या वृत्तानुसार त्यांचे निधन किडनी निकामी झाल्यामुळे झाले होते. मात्र तसे नाहीये त्यांचे निधन हे किडनी फेलमुळे झाले नाही. याबद्दलचा खुलासा त्यांचे जवळचे मित्र आणि “साराभाई व्हर्सेस साराभाई” मध्ये त्यांच्या मुलाची भूमिका साकारणारा अभिनेता राजेश कुमार यांनी खुलासा केला आहे. सतीश शाह यांचे निधन किडनी निकामी झाल्यामुळे झाले नाही तर अचानक हृदयविकाराच्या झटक्याने झाले आहे.

किडनी प्रत्यारोपणाने सतीश यांचे निधन झाले नाही तर….

राजेश कुमार यांनी बॉलिवूड हंगामाला सांगितले की, सतीश शाह यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झाली आणि त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे खरे कारण राजेश कुमार यांनी सांगितले. ते म्हणाले, “सतीशजींची प्रकृती आता नियंत्रणात आहे. किडनीशी संबंधित समस्या नियंत्रणात आली होती. त्यांची प्रकृती स्थिर होती, परंतु हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे अचानक निधन झाले.” राजेश यांनी असेही सांगितले की, अभिनेत्याचे घरी जेवण करत असताना निधन झाले. काही वेळातच त्यांना अचानक छातीत दुखू लागले आणि ते कोसळले.

जवळच्या मित्राने केला खुलासा

अभिनेत्याच्या अचानक जाण्याने त्याचे सहकलाकार, मित्र आणि चाहते यांना मोठा धक्का बसला आहे. राजेश कुमार म्हणाले की, गेले २४ तास त्याच्यासाठी अत्यंत भावनिक होते. त्याने स्पष्टपणे म्हटले की, “हे दुःखद आहे, परंतु लोकांना सत्य कळले पाहिजे: सतीशजींचे निधन किडनी निकामी झाल्यामुळे नव्हे तर हृदयविकाराच्या झटक्याने झाले.”

25 ऑक्टोबर रोजी सतीश शाह यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर विविध अफवा पसरू लागल्या होत्या. काहींनी याचे कारण मूत्रपिंड निकामी होणे, तर काहींनी प्रत्यारोपणाशी संबंधित गुंतागुंत असल्याचे सांगितले. तथापि राजेश यांनी मित्राच्या विधनाने सर्व अटकळींना पूर्णविराम दिला आहे.

सतीश शाह यांची कारकीर्द उत्तम होती 

“साराभाई विरुद्ध साराभाई,” “ये जो है जिंदगी,” “मैं हूं ना,” आणि “जाने भी दो यारों” सारख्या चित्रपट आणि शोसाठी ओळखले जाणारे सतीश शाह यांनी मनोरंजन विश्वावर एक अमिट छाप सोडली. त्यांचे विनोदी टायमिंग, साधेपणा आणि विचित्र संवाद शैलीमुळे ते प्रेक्षकांना खूप आवडले. सतीश शाह त्यांच्या पत्नी मधु शाह यांच्यासोबत राहत होते. ज्या बऱ्याच काळापासून अल्झायमरशी झुंज देत आहेत.

सतीश शाह अनेकदा त्यांच्या पत्नीची काळजी घेण्यासाठी जास्त काळ जगण्याची इच्छा व्यक्त करत असत. यामुळे काही महिन्यांपूर्वी त्यांना किडनी प्रत्यारोपण करावे लागले जेणेकरून ते बरे होऊन पुन्हा नव्याने आयुष्य जगू शकेल. त्यामुळे त्यांच्या जाण्याने धक्का बसला.