लंडन विमानतळावर सतीश शाह यांची उडवली खिल्ली; पण त्यांच्या उत्तराने जिंकलं भारतीयांचं मन

'कारण आम्ही भारतीय आहोत...', खिल्ली उडवल्यानंतर लंडन विमानतळ कर्मचाऱ्यांना सतीश शाह यांनी दिलेलं उत्तर चर्चेत

लंडन विमानतळावर सतीश शाह यांची उडवली खिल्ली; पण त्यांच्या उत्तराने जिंकलं भारतीयांचं मन
लंडन विमानतळावर सतीश शाह यांची उडवली खिल्ली; पण त्यांच्या उत्तराने जिंकलं भारतीयांचं मन
| Updated on: Jan 04, 2023 | 3:56 PM

मुंबई : ‘साराभाई वर्सेस सारभाई’ टीव्ही मालिकेतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते सतीश शाह सध्या त्यांच्या एका ट्विटमुळे तुफान चर्चेत आहेत. लंडन येथील हिथ्रो विमानतळावर सतीश शाह यांची विमानतळ कर्मचाऱ्यांनी खिल्ली उडवली. पण यासर्व प्रकरणामध्ये सतीश यांनी विमानतळ कर्मचाऱ्यांना दिलेलं उत्तर भारतीयांचं मन जिंकणारं आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतीश शाह यांचं ट्विट व्हायरल झाल्यानंतर हिथ्रो विमानतळाने त्यांची माफी देखील मागितली आहे.

सतीश शाह ट्विट करत म्हणाले, ‘मी गर्वाने हसत त्यांना उत्तर दिलं, ‘कारण आम्ही भारतीय आहोत…’ जेव्हा मी हिथ्रो विमानतळावर माझ्या स्टाममधील सहकाऱ्याला बोलताना ऐकलं, ‘या लोकांना फर्स्ट क्लास परवडू शकेल का …’ सतीश शाह यांनी ट्विट २ जानेवारी रोजी केलं आहे. सध्या त्यांच्या ट्विटची सर्वत्र चर्चा होत आहे.

 

 

सतीश शाह यांच्या ट्विटनंतर हिथ्रो विमानतळाने त्यांची माफी मागितली आहे. ‘गुड मॉर्निंग… ही घटना ऐकून प्रचंड वाईट वाटलं. आम्ही माफी मागतो… तुम्ही आम्हाला थेट मेसेज करू शकता…’ असं म्हणत लंडनच्या हिथ्रो विमानतळाने प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांची माफी मागितली आहे.

सतीश शाह यांनी ट्विट करताच, सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. आतापर्यंत १० लाखांपेक्षा अधिक युजर्सने यावर प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरीकडे १ हजार ३०० लोकांनी सतीश यांचं ट्विट रिट्विट केलं आहे. पण सतीश शाह यांच्याच ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कारण सतीश यांच्या ट्विटर अकाउंटपुढे निळ्या रंगाची टीक नाही. पण गेल्या काही फोटोंमध्ये सतीश शाह त्यांच्या मित्रांसोबत दिसले होते. सध्या सर्वत्र सतीश यांचं ट्विट व्हायरल होत असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.