बर्मन यांनी लता मंगेशकरांसोबत काम करणे थेट बंदच केलेले, काय होतं कारण? ‘या’ दिग्गजामुळे पुन्हा समेट झाली

बॉलिवूड अन् सिनेसृष्टीला अनेक अजरामर गाणी देणारे एस.डी. बर्मन आणि लता मंगेशकर यांच्यात एकेकाळी मोठा वाद झाला होता. एका गाण्याच्या पुन्हा रेकॉर्डिंगवरून दोघांमध्ये मतभेद इतके वाढले की काही वर्षे त्यांनी एकत्र काम केलं नाही. नेमकं काय झालेलं?

बर्मन यांनी लता मंगेशकरांसोबत काम करणे थेट बंदच केलेले, काय होतं कारण? या दिग्गजामुळे पुन्हा समेट झाली
SD Burman Lata Mangeshkar disagreement
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 26, 2026 | 8:21 PM

एस डी बर्मन यांनी संगीत क्षेत्रामध्ये अनेक नवे प्रयाेग केले. त्यांनी संगीताला सर्वोच्च स्थान दिलं. नवे प्रयोग करताना त्यांनी मागेपुढे पाहिलं नाही. त्यामुळेच त्यांच्या संगीतात ती खोली आणि वेगळेपण जाणवत राहतं आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतं. पण तेही अनेकदा वादात अडकले होते. त्यांचा वाद थेट सुरांची महाराणी गानकोकीळा लता मंगेशकर यांच्याशीही झालेला. त्यांचे गझलकार साहिर लुधियानवी यांच्यासोबतही संबंध खूप बिघडले होते. त्यांनी त्यानंतर कधीच एकत्र काम केलं नाही.

सचिनदेव बर्मन यांचे लता मंगेशकरांशी कसे बिघडले?

लता मंगेशकरांनी सांगितलेले की,  ‘हा प्रकार पग ठुमक चलत या गाण्याच्या रेकॉर्डिंगवेळी घडलेला. जेव्हा लता मंगेशकरांनी हे गाणे रेकॉर्ड केलेले तर तेव्हा दादा खूप खूश झालेले. त्यांनी हे गाणे पास केलेले. एकदा का संगीतकाराने ग्रीन सिग्नल दिला की ते गाणे फायनल मानले जाते. 1958 च्या सितारों से आगे या सिनेमातील हे गाणे होते.”

Loading...

‘बर्मन हे पूर्णपणे परफेक्शन शोधणारे होते. त्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं की आपल्याला ते गाणे परत रेकॉर्ड करायचे आहे. मी त्यांना सांगितलं की मी सध्या बाहेर जात आहे, असं सांगून नकार दिला. त्यामुळे बर्मन यांना राग आला. पण कलाकारांमध्ये अशा गोष्टी सामान्य आहेत’, असं लता मंगेशकरांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं.

पुन्हा कसे संबंध ठिक झाले?

दरम्यान, या वादानंतर प्रचंड मोठा काळ गेला. तब्बल चार वर्ष या दोघांनीही एकत्र काम केले नाही. 1962 मध्ये मात्र छोटे नवाब या सिनेमासाठी त्यांचे सुपूत्र राहुल देव बर्मन संगीतकार म्हणून काम करत होते. त्यांनी यावेळी दोन दिग्गजांमध्ये समेट घडवून आणण्याचं काम केलं. राहुल यांनी वडिलांना सांगितलेलं की, आपण लतादीदींकडून गाऊन घेणार आहेत. त्यानंतर लतादीदींनी केवळ ‘छोटे नवाब’साठीच नाही तर सचिनदेव बर्मन यांच्या बंदिनी फिल्मसाठीही गाणं गायलं. हे गाणं होतं ‘मोरा गोरा अंग लई ले’. या गाण्याचे बोल गुलजारांनी लिहिलेले. हे गाणे आजही प्रचंड लोकप्रिय आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us