सुहाना खान दिसणार वडील शाहरुख खान यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर, बाप लेकीची जोडी ‘या’ चित्रपटात करणार धमाका

शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत दिसत आहे. विशेष म्हणजे सुहाना खान ही सोशल मीडियावरही सक्रिय दिसत आहे. सुहाना खान आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. सुहाना खानची मोठी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

सुहाना खान दिसणार वडील शाहरुख खान यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर, बाप लेकीची जोडी या चित्रपटात करणार धमाका
| Updated on: Sep 02, 2023 | 6:58 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. झिरो चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर राहिला. शाहरुख खान याचे चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट बघताना दिसले. शेवटी शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून जोरदार पद्धतीने बाॅलिवूडमध्ये पुनरागमन केले. शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट (Movie) हिट ठरला. चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरातून तब्बल 100 कोटींची कमाई केली.

शाहरुख खान याच्यासाठी यंदाचे हे वर्षे अत्यंत खास ठरले. कारण या वर्षी त्याने चार वर्षांनंतर बाॅलिवूडमध्ये पुनरागमन केले. एका मागून एक चित्रपट शाहरुख खान याचे रिलीज होताना दिसणार आहेत. इतकेच नव्हे तर यंदाच शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान आणि मुलगी सुहाना खान हे बाॅलिवूडमध्ये पर्दापण करत आहेत.

सुहाना खान हिचा चित्रपट द आर्चीज हा काही दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून अजून दोन स्टार किड्स लाॅन्च केले जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुहाना खान ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील सुहाना खान दिसत आहे.

नुकताच आलेल्या रिपोर्टमध्ये आता आगामी चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि सुहाना खान हे एकसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. पहिल्यांदाच बाप लेकीची जोडी पडद्यावर बघायला मिळणार आहे. हा सुहाना खान हिचा दुसरा चित्रपट असणार आहे. रिपोर्टनुसार हा चित्रपट सुजॉय घोष यांच्या डायरेक्शनमध्ये तयार केला जाणार आहे.

विशेष म्हणजे सुहाना खान हिच्या चित्रपटात फक्त शाहरुख खान याचा केमिओ नसून तो महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख खान या चित्रपटात काम फक्त आपल्या लेकीसाठी करणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. विशेष म्हणजे सुहान खान या चित्रपटात एका जासूसच्या भूमिकेत असल्याची देखील माहिती मिळत आहे.

लवकरच सुहाना खान हिच्या या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुख खान याने सुहाना खान हिचा एक फोटो इंस्टा स्टोरीवर शेअर केला होता. या फोटोमध्ये सुहाना खान ही मांजरीला मांडीवर घेऊन बसल्याचे दिसत होते. या फोटोमध्ये शाहरुख खान हा आपल्या मुलीचे काैतुक करताना दिसला होता.