शाहरुखच्या ‘मितवा’ गाण्याच्या गायकाला गंभीर आजार, वर्षभर बेडरेस्ट; चाहत्यांना मोठा धक्का

शाहरुख खानच्या 'मितवा' गाण्यामुळे भारतात लोकप्रिय झालेले पाकिस्तानी गायक शफकत अमानत अली यांना गंभीर आजाराचं निदान झालं. या आजारामुळे त्यांना वर्षभर बेडरेस्टवर राहावं लागलं. आता त्यांनी आपल्या आजारपणाबाबत मोठा खुलासा केला आहे.

शाहरुखच्या मितवा गाण्याच्या गायकाला गंभीर आजार, वर्षभर बेडरेस्ट; चाहत्यांना मोठा धक्का
शाहरुख खान आणि प्रसिद्ध गायक शफकत अमानत अली
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 24, 2026 | 9:37 AM

बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट गाण्यांना आपला आवाज देणारे पाकिस्तानी गायक शफकत अमानत अली यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘कभी अलविदा ना कहना’ चित्रपटातील ‘मितवा’ या गाण्यामुळे भारतातही प्रचंड लोकप्रिय झालेल्या शफकत यांना रक्ताच्या कर्करोगाचं निदान झालं होतं. या आजारामुळे त्यांना तब्बल वर्षभर अंथरुणाला खिळून राहावं लागलं. गेल्या काही वर्षांपासून ते चित्रपट आणि लाइव्ह कॉन्सर्टपासून दूर का होते, याचं कारण आता त्यांनी स्वत:च सांगितलं आहे. कराचीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांच्या आजारपणाचा आणि उपचारांचा कठीण काळ उलगडला.

शफकत अमानत अली यांना ‘मल्टिपल मायलोमा’ (Multiple Myeloma) या प्रकारच्या रक्ताच्या कर्करोगाचं निदान झालं होतं. हा आजार झाल्याचं कळल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. सुरुवातीला त्यांनी या आजाराची माहिती काही जवळच्या मित्रांपासूनही लपवून ठेवली होती. कुटुंबीयांसह उपचारांवर लक्ष केंद्रीत करणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. सुदैवाने आजाराचं निदान योग्य वेळी झालं आणि त्यांनी तातडीने उपचार सुरू केले. याबद्दल बोलताना शफकत म्हणाले की, हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळ होता. या आजाराने त्यांचं कुटुंब, मित्र आणि चाहतेही हादरले होते. आजाराशी झुंज देताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

Loading...

पहा व्हिडीओ-

वर्षभर बेडरेस्ट, दर आठवड्याला केमोथेरपी

या आजारामुळे शफकत यांना जवळपास एक वर्ष बेडरेस्टवर राहावं लागलं. गायकासाठी स्टेजपासून आणि संगीतापासून दूर राहणं किती कठीण असतं, हे त्यांनी सांगितलं. कलाकारांना सतत काम करण्याची आणि प्रेक्षकांसमोर सादरीकरण करण्याची इच्छा असते. मात्र, प्रकृतीमुळे त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. शफकत यांनी सांगितलं की, त्यांच्यावर केमोथेरपीचे उपचार झाले आहेत. सध्या त्यांना दर आठवड्याला मेंटेनन्स थेरपी घ्यावी लागते. ही केमोथेरपीची तुलनेनं सौम्य पद्धत आहे. याशिवाय त्यांच्यावर अद्याप स्टेम सेल थेरपी होणं बाकी आहे. आपण आता बरे झालो आहोत, असं त्यांनी सांगितलं असलं तरी उपचारांची प्रक्रिया सुरू आहे.

‘मितवा’ गाण्यामुळे मिळाली होती लोकप्रियता

शफकत अमानत अली यांनी बॉलिवूडमध्ये अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत. 2006 मध्ये शाहरुख खानच्या ‘कभी अलविदा ना कहना’ चित्रपटातील ‘मितवा’ या गाण्याने त्यांना भारतात विशेष लोकप्रियता मिळवून दिली. याशिवाय ‘डोर’ चित्रपटातील ‘ये हौसला’, ‘आय हेट लव्ह स्टोरीज’मधील ‘बिन तेरे’, ‘माय नेम इज खान’मधील ‘तेरे नैना’ आणि ‘रा.वन’मधील ‘दिलदारा’ ही त्यांची गाजलेली गाणी आहेत.

आजारपणानंतर पुन्हा स्टेजवर

आजारपणातून सावरल्यानंतर शफकत यांनी लाहोरमध्ये एका कार्यक्रमातून पुन्हा स्टेजवर पुनरागमन केलं. आता 28 नोव्हेंबरला कराचीमध्ये त्यांचा कार्यक्रम होणार आहे. याशिवाय लाहोर आणि इस्लामाबादमध्येही त्यांचे कॉन्सर्ट आयोजित केले जाणार आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us