Satej Patil: पाप झाकण्यासाठीच… ‘गोकुळ’चा गड सर करण्यासाठी रोहतगी यांना 80 लाख मोजल्यावरून सतेज पाटील यांचा संताप
Satej Patil on Gokul And State Government: गोकुळची लढाई जिंकण्यासाठी राज्य सरकारने ॲड मुकुल रोहतगी यांना युक्तीवादासाठी ८० लाख रुपये मोजल्याचे समोर आल्यानंतर आता विरोधकांनी मोर्चा उघडला आहे. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेतून सरकारची खरडपट्टी काढली आहे.

Satej Patil on Gokul And State Government: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची, गोकुळची निवडणूक ही संपूर्ण राज्यानेच नाही तर देशानं अनुभवली. ही निवडणूक राज्य सरकारने अत्यंत प्रतिष्ठेची केल्याचे दिसले. अध्यक्ष आणि कार्यकारिणी निवडीला महायुतीच्या सदस्यांनी ऐनवेळी दांडी मारली. मग शासन नियु्क्त संचालक नेमण्यात आले आणि नंतरचे महाभारत आणि घडलेले रामायण उभ्या महाराष्ट्राने पाहिले. पण गोकुळचा गड सर करण्यासाठी आणि कायदेशीर युक्तीवादासाठी सरकारने ॲड मुकुल रोहतगी यांना ८० लाख रुपये मोजल्याचे समोर येताच एकच खळबळ उडाली आहे. ८० लाखांची उधळपट्टी कशाला? असा सवाल विचारल्या जात आहे. तर आताच घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी सरकारची या मुद्दावरून चांगलीच खरडपट्टी काढली.
पाप झाकण्यासाठीच उधळपट्टी
शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी अशी वकिलांची फौज वापरण्यात आली होती का? ओबीसी ट्रिपल टेस्टच्या वादावेळी सरकारने खास कायदेशीर मसलतीचे धोरण राबवले का, यातून सरकारची प्रायोरिटी दिसते. आपले पाप झाकण्यासाठी कायद्याद्वारे निष्णात वकिलांना नेमायचं आणि आपलं पाप धुण्यासाठी कायद्याच्या कसोटीवर ते टिकवण्यासाठी केलेलं हे षडयंत्र आहे. उद्या, भविष्य काळात जनतेसमोर हे येईलच. पण एका बाजूला दुष्काळाची झळ बसत आहे. एका बाजूला ९४ लाख लाडक्या बहिणींचे रक्कम रद्द करण्याचे पाप महाराष्ट्रात केलं आहे. बेरोजगारी वाढत चालली आहे. एमपीएससी मार्फत भरती तुम्ही करत नाहीत. दुसऱ्या बाजूला मात्र उधळपट्टीसाठी शासनाकडे पैसे आहेत. यातून शासनाची प्रायोरिटी दिसून येते, असा भीमटोला आमदार सतेज पाटील यांनी सरकारने बाजू मांडण्यासाठी वकील मुकुल रोहतगी यांना ८० लाख रुपये मोजल्याप्रकरणी लगावला.
म्हणजे सरकारी वकिलांवरही त्यांचा विश्वास नाही
लोकशाही पायदळी तुडवायची आहे. कसंही करून आम्हाला सत्ता मिळवायची आहे. सत्तेत बसायचा आहे. लोकांचे बहुमत उलथवून टाकायचे आहे. नाहीतर मग एवढा ऑर्डिनन्स जर मजबूत होता, तर इतक्या निष्णात वकिलाची गरज काय होती? सरकारी वकिलाने बाजू मांडली. विधी आणि न्याय विभाग शासनाचा आहे. एक यंत्रणा आहे. निष्णात वकील तिथे आहे. म्हणजे त्यांच्यावरही सरकारचा विश्वास नाही, हेच यातून दिसत आहे. कायद्याच्या कसोटीवर आपण टिकणार नाही, म्हणून मग घटनेचा अभ्यासू वकिल आणायचे आणि हा कायदा कसा टिकवता येईल, हा दुर्देवी प्रयत्न असल्याचे दिसून येते, असा टोला ही सतेज पाटील यांनी लगावला.
बातमी अपडेट होत आहे…
