Shah Rukh Khan: मक्कामध्ये शाहरुखने केला ‘उमराह’; व्हायरल फोटोवर कमेंट्सचा वर्षाव

मक्कामधील शाहरुखचा फोटो व्हायरल; 'उमराह' करतानाचा व्हिडीओ व्हायरल

Shah Rukh Khan: मक्कामध्ये शाहरुखने केला उमराह; व्हायरल फोटोवर कमेंट्सचा वर्षाव
Shah Rukh Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 02, 2022 | 8:16 AM

मक्का: बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात शाहरुख खानने नुकतंच त्याच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाचं सौदी अरेबमधील शूटिंग पूर्ण केलं. या शूटिंगनंतर शाहरुखचे काही खास फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. कारण शूटिंग संपल्यानंतर किंग खानने मक्काला भेट दिली. मक्का शहरातील काबा या जागेला इस्लाममधलं सगळ्यात पवित्र स्थळ मानलं जातं. मक्कामध्ये शाहरुखने उमराह केल्याचं म्हटलं जात आहे. त्याच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

सौदी अरेबमधील मक्का याठिकाणी शाहरुख उमराह करण्यासाठी पोहोचला होता. त्याचेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी शाहरुखने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. उमराह ही एक धार्मिक प्रक्रिया आहे. हज यात्रा ही वर्षाच्या एका विशेष महिन्यात केली जाते. मात्र उमराह वर्षातून कधीही करता येते.

शाहरुखने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत डंकीचं सौदी अरबमधील शूटिंग शेड्युल पूर्ण केल्याची माहिती चाहत्यांना दिली. या व्हिडीओतून त्याने चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. यानंतर तो मक्कामध्ये उमराह करण्यासाठी निघाला.

गुरुवारी शाहरुखने त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटाचा आणखी एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही भूमिका आहेत. 25 जानेवारी 2023 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पठाण, जवान आणि डंकी हे शाहरुखचे तीन चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत.

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ या चित्रपटानंतर शाहरुखने खूप मोठा ब्रेक घेतला. ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात त्याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली. मात्र त्याला मुख्य भूमिकेत पाहण्यासाठी चाहते आतूर आहेत.