Jawan Advance Booking : भारतात ‘जवान’च्या कमाईची दमदार सुरुवात; मोडणार सर्व रेकॉर्ड

Jawan Advance Booking : 'पठाण' सिनेमानंतर शाहरुख खान स्टारर 'जवान' सिनेमा मोडणार सर्व विक्रम; भारतात 'जवान' सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगला दमदार सुरुवात...

Jawan Advance Booking : भारतात जवानच्या कमाईची दमदार सुरुवात; मोडणार सर्व रेकॉर्ड
| Updated on: Sep 01, 2023 | 12:43 PM

मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या काही दिवसांपासून ‘जवान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. चाहते देखील अभिनेत्याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. शाहरुख खानच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, साता समुद्रापार देखील आहे. त्यामुळे किंग खान याची झलक पाहण्यासाठी परदेशातील चाहते उत्सुक असतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. महत्त्वाचं म्हणजे सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगला दमदार सुरुवात झाली आहे. किंग खान याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट ॲडव्हान्स बुकिंगबद्दल मोठी माहिती दिली आहे.

सोशल मीडियावर अभिनेत्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. किंग याने सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करत ॲडव्हान्स बुकिंग सुरु झाल्याची माहिती दिली आहे. शुक्रवार पासून सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर किंग खान याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

 

 

शाहरुख खानने एक पोस्ट शेअर केली. व्हिडीओमध्ये किंग खान लोकांच्या कमेंट्स वाचताना दिसत आहे. जवानाच्या ट्रेलरची झलकही व्हिडिओमध्ये दाखवण्यात आली आहे. शाहरुख व्हिडिओमध्ये म्हणतो- ‘प्रत्येकजण जवानासाठी खूप उत्सुक आहे.’ व्हिडिओ शेअर करताना शाहरुख याने कॅप्शनमध्ये, ‘तुमची आणि माझी प्रतीक्षा आता संपली आहे. जवान सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे…. असं लिहिलं आहे.

किंग खान याच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘पूर्ण चित्रपटगृह बूक करु…’, दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, ‘तिकिट कितीही रुपयांचं असूदेत किंग खान याला पाहायचं म्हणजे पाहायचं आहे…’, तर आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘पूर्ण चित्रपटगृह गाजवू…’ सध्या फक्त आणि फक्त ‘जवान’ सिनेमाची चर्चा रंगत आहेत.

‘जवान’ सिनेमाचं ट्रेलर प्रदर्शित

३१ ऑगस्ट रोजी ‘जवान’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांमध्ये किंग खान याची क्रेझ वाढताना दिसत आहे. आता किंग खान याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘जवान’ सिनेमात शाहरुख खान पाच वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे.

शाहरुख खान स्टारर जवान सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाचं दिग्दर्शन दिग्दर्शक अटली कुमार यांनी केलं आहे. सिनेमात शाहरुखसोबतच नयनतारा, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा आणि विजय सेतुपती सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.