शाहरुखच्या ‘पठाण’मधील गाण्यावर कॉपीचा आरोप; दीपिकाच्या डान्सची उडवली खिल्ली; मीम्स व्हायरल

'पठाण'चं गाणं वादाच्या भोवऱ्यात; दीपिकाचा आतापर्यंतचा सर्वांत बोल्ड अंदाज मात्र..

शाहरुखच्या पठाणमधील गाण्यावर कॉपीचा आरोप; दीपिकाच्या डान्सची उडवली खिल्ली; मीम्स व्हायरल
'पठाण'मधील दीपिकाच्या डान्सची उडवली खिल्ली; मीम्स व्हायरल
Image Credit source: Facebook
| Updated on: Dec 14, 2022 | 12:26 PM

मुंबई: शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. कारण या चित्रपटाच्या माध्यमातून तो जवळपास चार वर्षांनंतर कमबॅक करतोय. ‘ब्रह्मास्त्र’मध्ये शाहरुखची भूमिका छोटीच होती. त्यामुळे त्याला मुख्य भूमिकेत पाहण्यासाठी चाहते आतूर आहेत. पठाण चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ हे पहिलं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं. दीपिका पदुकोणचा सेन्शुअल डान्स हा या गाण्यातील चर्चेचा विषय ठरला आहे. इतकंच नव्हे तर तिच्या डान्स स्टेप्सची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जातेय.

बेशर्म रंग या गाण्यात दीपिकाचा आतापर्यंतचा सर्वांत बोल्ड अंदाज पहायला मिळाला असं म्हटलं जातंय. या गाण्यातील दीपिकाच्या डान्स स्टेप्सवरून नेटकऱ्यांनी भन्नाट मीम्स व्हायरल केले आहेत. दीपिकाने यात ट्वर्किंग हा डान्सचा प्रकार केला. मात्र त्यावरूनच तिची खिल्ली उडवली जातेय.

पठाणमधील या गाण्याला मकीबाच्या गाण्याची कॉपीही असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे या संपूर्ण गाण्यावर प्रश्न उपस्थित झाला आहे. या दोन्ही गाण्यांची धून एकच असल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. इतकंच नव्हे तर काहींनी मकीबाच्या गाण्याची क्लिपसुद्धा पुराव्यासाठी शेअर केली आहे.

बेशर्म रंग हे गाणं आणि मकीबाचं गाणं ऐकल्यानंतर दोन्हींमध्ये बरीच समानता आढळून येते. मकीबाचं गाणं फ्रेंच गायक जैनने गायलं आहे. 2015 मध्ये हे गाणं प्रदर्शित झालं होतं. त्यावेळी हे गाणं सुपरहिट झालं होतं.

बेशर्म रंग या गाण्याची कोरिओग्राफी वैभवी मर्चंटने केली आहे. पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. 2018 मध्ये शाहरुखचा ‘झिरो’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता चार वर्षांनंतर शाहरुख मुख्य भूमिकेत पररतोय.