AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar : फक्त 16 रुपयात धुरंधर पाहा… अशी होतेय जोरात विक्री; सर्वच थक्क

Dhurandhar: अभिनेता रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर' सिनेमाने फक्त भारतात नाही तर, जगभरात मोठी कमाई केली. पण पाकिस्तान सारख्या गल्फ केंट्रीजमध्ये बॅन असताना देखील पाकिस्तान 'धुरंधर' सिनेमाच्या जोरावर कमाई करत आहे. याचा एका परदेशी युट्यूबरने खुलासा केला आहे.

Dhurandhar : फक्त 16 रुपयात धुरंधर पाहा... अशी होतेय जोरात विक्री; सर्वच थक्क
अभिनेता रणवीर सिंग
| Updated on: Feb 13, 2026 | 4:08 PM
Share

Dhurandhar: ‘धुरंधर’ सिनेमाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातल्यानंतर आता ‘धुरंधर 2’ सिनेमाच्या प्रतिक्षेत चाहते आहेत. ‘धुरंधर’ सिनेमा अद्यापही बक्कळ कमाई करताना दिसत आहे. सिनेमाने जगभरात तब्बल 1300 कोटी रुपयांची कमाई केली आहे. एवढंच नाही तर, पाकिस्तान सारख्या गल्फ केंट्रीजमध्ये बॅन असताना देखील पाकिस्तान ‘धुरंधर’ सिनेमाच्या जोरावर कमाई करत आहे. नेटफ्लिक्सवर देखील सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, धुरंधर सिनेमा पाहण्यासाठी पाकिस्तानातील लोकं उत्सक आहेत. दरम्यान, एका युट्यूबरने कराचीच्या एका बाजारपेठेचा व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये बंदी असूनही सिनेमा पाकिस्तानात विकला जात असल्याचं उघड झालं. तसेच, लोक पायरेटेड प्रती किती किमतीत खरेदी करत आहेत ते देखील समोर आलं आहे.

रणवीर सिंगच्या “धुरंधर” सिनेमाला सर्व स्तरातून प्रचंड प्रेम मिळत आहे. पण, हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होताच, पाकिस्तानमधील लोक तो पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. तेथील लोक सिनेमाच्या गाण्यांचे रील व्हिडिओ बनवतानाही दिसले आहेत. धुरंधर सिनेमाच्या दुसऱ्या भागामध्ये रणवीर सिंग ल्यारीचा राजा बनण्यासाठी मोठी लढाई लढताना दिसणार आहे, तर धुरंधरच्या पायरेटेड प्रती पाकिस्तानमध्ये स्वस्तात विकल्या जात आहेत… हे देखील समोर आलं आहे.

न्यूझीलंडचा युट्यूबर कार्ल रॉक याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, रणवीर सिंगच्या “धुरंधर” सिनेमाच्या पायरेटेड प्रती पाकिस्तानी दुकानांमध्ये फक्त 50 रुपये, अंदाजे 16 रुपयांना उघडपणे विकल्या जात आहेत.

भारतीय सिनेमांवर अधिकृत बंदी असूनही पाकिस्तानात विकल्या जाणाऱ्या धुरंधरसह अनेक सिनेमांच्या डीव्हीडी कार्ल हायलाइट करताना व्हिडीओत दिसत आहेत. सांगायचं झालं तर, रणवीर याची आजी – आजोबा फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानातून भारतात आले होते आणि रणवीर सिंधी आहे… असं देखील कार्ल व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला