आनंदाने वैवाहिक आयुष्य जगणाऱ्या Shah Rukh Khan ची पहिली गर्लफ्रेंड कोण होती?

कोण होती Shah Rukh Khan ची पहिली गर्लफ्रेंड? अभिनेत्याने घेतलेल्या महिलेचं नाव ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

आनंदाने वैवाहिक आयुष्य जगणाऱ्या Shah Rukh Khan ची पहिली गर्लफ्रेंड कोण होती?
'पठाण' सिनेमानंतर शाहरुख खान चाहत्यांना देणार मोठं गिफ्ट; ज्यासाठी अभिनेता करतोय प्रचंड मेहनत
| Updated on: Jan 13, 2023 | 9:19 AM

Shah Rukh Khan first girlfriend : अभिनेता शाहरुख खानची (Shah Rukh Khan) लव्ह स्टोरी अभिनेत्याच्या प्रत्येक चाहत्याला माहिती आहे. एखाद्या सिनेमा सारखीच अभिनेत्याची लव्हस्टोरी आहे. आज अभिनेता पत्नी गौरी खान आणि तीन मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. पण चाहते अभिनेत्याला कायम त्याच्या खासगी आयुष्याबद्दल चाहते प्रश्न विचारत असतात. आता देखील आस्क मी एनिथिंग सेशन दरम्यान एका युजरने अभिनेत्याला पहिल्या गर्लफ्रेंडबद्दल विचारलं आहे. युजरच्या प्रश्नाचं उत्तर अभिनेत्याने खास अंदाजात दिलं आहे. (Shah Rukh Khan love story)

आस्क मी एनिथिंग सेशन दरम्यान एका युजरने अभिनेत्याला पहिली गर्लफ्रेंड कोण होती? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुखने दिलेलं उत्तर चाहत्यांना देखील प्रचंड आवडलं आहे. शाहरुख उत्तर देत म्हणाला, ‘माझी पत्नी गौरी..’ सध्या अभिनेत्याचं हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (shah rukh and gauri khan)

 

 

शाहरुख आणि गौरी यांचं लग्न
शाहरुख आणि गौरी यांची जेव्हा पहिली भेट झाली होती, तेव्हा दोघे तरुण होते. १९९१ साली दोघांनी लग्न केलं. पण तेव्हा शाहरुखला प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळख मिळाली नव्हती. आज शाहरुख जगातील श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. शाहरुख आणि गौरी यांनी तीन मुले आहेत. आर्यन खान, सुहाना खान आणि आबराम खान अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत.

शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमा
‘पठाण’ सिनेमातील ‘बेशर्म रंग’ गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोनने घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे सिनेमा वादाच्या भोवऱ्यात आडकला होता. आता २५ जनेवारी रोजी ‘पठाण’ मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.

मीडियारिपोर्ट्स नुसार, ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशर्म रंग’ गाण्यावर होणारा विरोध पाहता सेंसर बोर्डाने सिनेमातील काही सिनवर कात्री चालवली असून सिनेमात महत्त्वाचे बदल केले आहेत. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहते शाहरुख आणि दीपिका स्टारर ‘पठाण’ सिनेमामुळे चर्चेत आहे.