Mira Rajput : 21 व्या वर्षीच आई झाली शाहिद कपूरची बायको, अनेक वर्षांनंतर स्पष्टच म्हणाली…

Mira Rajput : वयाच्या 21 व्या वर्षी मिरा राजपूतने 34 वर्षीय शाहिद कपूरसोबत केलं लग्न, त्यानंतर झाली आई, 21 व्या वर्षांतच आई झाल्यानंतर आलेले आनुभव सांगत मिराने मोठं वक्तव्य केलं आहे...

Mira Rajput : 21 व्या वर्षीच आई झाली शाहिद कपूरची बायको, अनेक वर्षांनंतर स्पष्टच म्हणाली...
शाहिद कपूर - मिरा कपूर
| Updated on: Oct 31, 2026 | 8:12 AM

Mira Rajput : अभिनेता शाहिद कपूर याची बायको मिरा कपूर हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. मिरा अभिनय विश्वात सक्रिय नसली तरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम सक्रिय असते. आता देखील मिरा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मिरा हिने वयाच्या 21 व्या वर्षी शाहिद कपूर याचासोबत लग्न केलं. तेव्हा शाहिद कपूर याचं वय 34 वर्ष होतं. त्यानंतर वयाच्या 21 व्या वर्षीच मिरा हिने लेक मिशा हिला जन्म दिला. यावर अनेक वर्षांनंतर मिरा हिने मौन सोडलं आहे.

सांगायचं झालं तर, मिरा सध्या अभिनेत्री करीना कपूर हिचा What Women Want या शोमुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनेकांना मिरा आणि करीना यांना एकत्र पाहायचं होतं. कारण करीना आणि शाहिद एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते… शोमध्ये करीना हिने मिरा विचारलं, ’21 व्या वर्षी आई झालीस, आता असं वाटतं का, त्या वयात दुसरं काही आणखी चांगलं केलं असतं?’

Loading...

करीनाच्या या प्रश्नावर मिरा म्हणाली, ‘नाही मला असं कधीच वाटलं नाही… तुमचं वय कितीही असो मातृत्व एक आव्हान आहे. मला आणि तुला वेगळ्या वयात मुलं झाली आहेत. मी नक्कीच सांगू शकेल की, अव्हानांचा सामना तू देखील केलाच असणार… मुलांचा सांभाळ करणं फार मोठी गोष्ट आहे आणि त्या काळात मला शाहिदने खूप मदत केली. तो खूप सपोर्टिव आहे. माझ्या दोन बहिणी आणि त्यांची 2 मुलं आहे… याच कारणामुळे मी कोणतं पुस्तर वाचलं नाही कारण मी त्यांना मोठं होताना पाहिलं आहे…’, असं मिरा म्हणाली.

पुढे मिरा असं देखील म्हणाली की, ‘मी माझ्या मुलांसोबत खूप चांगला वेळ घालवते… जेव्हा मी 41 वर्षांची होईल तेव्हा माझी मिशा 21 वर्षांची असेल… म्हणजे मला माझ्या मुलांसोबत जास्त काळ वेळ घालवता येईल…’, असं देखील मिरा म्हणाली.

शाहिद आणि मिरा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, कुटुंबियांच्या सहमतीने त्यांनी लग्न केलं. 2015 मध्ये शाहिद आणि मिराचं लग्न मोठ्या थाटात झालं. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us