Sharad Kapoor : फाटलेली गादी, घाणेरडी खोली अन् श्वानांची विष्ठा…शरद कपूरची दयनीय अवस्था पाहून चाहते सुन्न; मैत्रिणीने शेअर केला अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

Sharad Kapoor Video : कपूरची मैत्रीण हेमा चौधरीनं अभिनेत्याचा एक व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ पाहून नेटकरी सुन्न झाले आहेत.

Sharad Kapoor : फाटलेली गादी, घाणेरडी खोली अन् श्वानांची विष्ठा...शरद कपूरची दयनीय अवस्था पाहून चाहते सुन्न; मैत्रिणीने शेअर केला अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
| Updated on: Nov 21, 2026 | 4:47 PM

अभिनेता शरद कपूर त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि आरोग्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्याची अवस्था पाहून सर्वांना दुःख झालं आहे. अभिनेत्याची मैत्रीण हेमी चौधरीनं शरदचा एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ 24 ऑक्टोबर रोजी रेकॉर्ड करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये शरद आपल्या कुत्र्यांसोबत एका घाणेरड्या, दुर्गंधीयुक्त खोलीत अत्यंत दयनीय अवस्थेत राहत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.

शरद कपूरची वाईट अवस्था

Loading...

शरद ज्या घरात राहत आहे ते घर घाणीनं भरलेलं आहे. कुत्र्यांनी गादी पूर्णपणे फाडून टाकली आहे. तो फक्त जीन्स घालून, बनियन न घालता गादीवर झोपला आहे. तो घाणेरड्या भिंती आणि दुर्गंधीयुक्त पसारा असलेल्या घरात राहत आहे. खोलीत सर्वत्र अन्न सांडलेलं आहे आणि कुत्र्यांची विष्ठा पसरलेली आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांची मनं हेलावली आहेत. याच दिवशी शरदच्या कुत्र्यांना एका निवारागृहात नेण्यात आलं होतं. शरद कपूरचीही या दयनीय परिस्थितीतून सुटका करण्यात आली.

व्हिडिओमध्ये शरद त्याच्या कुत्र्यांसोबत एका फाटलेल्या पलंगावर बसलेला दिसत आहे. हेमाची टीम कुत्र्यांना निवारागृहात नेण्यासाठी आली आहे. शरद कपूर म्हणाला, ‘तुम्हाला पोलिसांना बोलवायचं असेल तर बोलवा, पण मी कुत्र्यांना सोडणार नाही.’ व्हिडिओमधील शरद कपूरची अवस्था पाहून लोक म्हणत आहेत की, त्याला मदतीची गरज आहे. काहींनी शरदला मदत केल्याबद्दल हेमाचं कौतुकसुद्धा केलं, तर काहींनी याला पब्लिसिटी स्टंट म्हटलं.

 

लोकांना शरदबद्दल सहानुभूती वाटते, पण त्याच्या बदलत्या वक्तव्यांमुळे नेटकरी गोंधळात पडले आहेत. कधी तो काम मागतो, तर कधी तो म्हणतो की, त्यानं इंडस्ट्रीतील सदस्यांकडून कोणतंही काम मागितलेलं नाही. शरदनं असंही म्हटलं की, त्याला एका हॉलिवूड चित्रपटाची ऑफर आली होती. त्यानं असाही दावा केला की, शाहरुख खाननं त्याला मदत केली. पण, शरदची मैत्रीण हेमानं स्पष्ट केलं की, शाहरुख खाननं कोणतीही मदत देऊ केलेली नाही. हेमाने सांगितलं की, शरदची मानसिक स्थिती चांगली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us