Video: कोमेजलेला चेहरा, डोळ्यात अश्रू; शेफालीच्या निधनानंतर पती परागची पहिली प्रतिक्रिया

कांटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला अवघ्या 42 व्या वर्षी जग सोडून गेली आहे.आता शेफालीचा पती पराग त्यागीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

Video: कोमेजलेला चेहरा, डोळ्यात अश्रू; शेफालीच्या निधनानंतर पती परागची पहिली प्रतिक्रिया
Shefali Jariwala Husband reaction
| Updated on: Jun 28, 2025 | 9:22 PM

बॉलीवूड अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यूमुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. कांटा लगा फेम शेफाली अवघ्या 42 व्या वर्षी जग सोडून गेली आहे. तिचा मृत्यू कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. अशातच आता शेफालीचा पती पराग त्यागीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

काय म्हणाला पराग त्यागी?

शेफाली जरीवालाच्या निधनानंतर पती पराग त्यागीने माध्यमांसमोर हजेरी लावली. यावेळी त्याचा चेहरा कोमेजलेला होता, तसेच त्याच्या डोळ्यात अश्रू होते. शेफालीबाबत बोलताना तो म्हणाला की, ‘मी सर्वांना विनंती करतो. माझ्या परीसाठी फक्त प्रार्थना करा. ती जिथे असेल तिथे आनंदी आणि शांत राहो.’ यानंतर तो निघून गेला.

 

शेफालीच्या आईलाही भवना अनावर

शेफालीचे तिच्या आईवर फार प्रेम होते. याआधी सोशल मीडियावर शेफालीने तिच्या आईसोबत अनेक फोटो शेअर केलेले आहेत. विशेष म्हणजे शेफाली आणि तिची आई सुनिता जरीवाला या दोघी सोबत अनेकदा फिरायलाही गेलेल्या आहेत. आता मात्र शेफाली या जगात नाही. आपली लेक हे जग सोडून गेल्याचं दु:ख सुनिता जरीवाला यांना आवरलेलं नाही. मुलीचा मृत्यू झाल्याचे समजताच त्यांना रडू कोसळलंय. त्यांचे हृदय पिळवटून टाकणारे काही फोटो समोर आले आहेत.

अनेक चित्रपटांत केलं काम

दरम्यान, शेफालीवर आजच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. काटा लगा या गाण्यामुळे ती घराघरात पोहोचली होती. तिचे इन्स्टाग्राम यासारख्या समाजमाध्यमावर लाखो फॉलोअर्स होते. तिने मुझसे शादी करोगी, शैतानी रस्मे, बेबी कम ना, बू अशा अनेक चित्रपटांत काम केलेलं आहे. या चित्रपटांत तिने केलेल्या कामाची चांगलीच प्रशंसा झाली होती.