
Shefali Jariwala Demise: ‘कांटा लगा गर्ल’ हिने शुक्रवारी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे शेफाली हिचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.रात्री उशिरा शेफालीची तब्येत बिघडल्यानंतर, पती पराग त्यागी तिला बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला, जिथे अभिनेत्रीला मृत घोषित करण्यात आलं. शेफालीच्या मृत्यूनंतर, पराग हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये पराग स्वतःचा चेहरा लपवताना दिसत आहे.
पराग त्यागी हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो गाडीच्या पुढच्या सीटवर बसलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये, त्याची पत्नी शेफाली जरीवाला गमावल्याचं दुःख अभिनेत्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते. पराग याने स्वतःचं दुःख लपवण्यासाठी चेहऱ्यावर हात ठेवला होता. सध्या व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
शेफाली जरीवालाच्या मृत्यूमागील खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण अभिनेत्रीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती समोर येत आहे. वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी शेफालीच्या अचानक निधनाची बातमी ऐकून सेलिब्रिटींनाही धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या निधनावर अली गोनी, मीका सिंग, राजीव अदातिया, काम्या पंजाबी यांसारख्या सेलिब्रिटींनी दुःख व्यक्ता केलं आहे.
2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांटा लगा’ अल्बममुळे एका रात्रीत शेफाली स्टार झाली आणि कांटा गला गर्ल अशी ओळख अभिनेत्रीला मिळाली. त्यानंतर शेफालीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. अनेक मालिका आणि रिऍलिटी शोमध्ये देखील शेफाली झळकली. बूगी – वूगी, नच बलिये 5 आणि अभिनेता सलमान खान याचा वादग्रस्त शो ‘बिग बॉस’ च्या 13 सिझनमध्ये देखील अभिनेत्री दिसली. बिग बॉसमुळे शेफालीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.
पण गेल्या काही वर्षांपासून शेफाली छोट्या पडद्यापासून देखील दूर होती. पण चाहत्यांमध्ये अभिनेत्रीची क्रेझ कायम पाहायला मिळाली. सोशल मीडियावर देखील शेफाली कायम सक्रिय असायची. शेफालीने 3 दिवसांपूर्वी एक फोटोशूट देखील केले होते. सध्या शेफालीची शेवटची पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेवटच्या पोस्टमध्ये तिने केलेल्या फोटोशूटचे फोटो आहेत, तर अभिनेत्रीने कॅप्शनध्ये Bling it on baby ! असं लिहिलं होतं.