कांटा लगा गर्लचं 42 व्या वर्षी निधन, कुटुंबासाठी कोट्यवधींची संपत्ती मागे सोडून गेली अभिनेत्री
Shefali Jariwala Death: कुटुंबासाठी कोट्यवधींची संपत्ती मागे सोडून गेली कांटा लगा गर्ल, भूमिका मिळत नसताना कशी कमवायची कोट्यवधींची माया? अभिनेत्रीच्या निधनानंतर कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Shefali Jariwala Death: मॉडेल आणि अभिनेत्री शेफाली जरीवाला हिच्या अचानक झालेल्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 42 व्या वर्षी शेफाली हिने जगाचा निरोप घेतला आहे. कांटा लगा गर्लच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर तर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कार्डिक असेस्टमुळे शेफाली हिचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. कामय आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी शेफाली कुटुंबासाठी कोट्यवधींची संपत्ती मागे सोडून गेली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शेफालीच्या निधनाची चर्चा सुरु आहे.
2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांटा लगा’ अल्बममुळे एका रात्रीत शेफाली स्टार झाली आणि कांटा गला गर्ल अशी ओळख अभिनेत्रीला मिळाली. त्यानंतर शेफालीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. अनेक मालिका आणि रिऍलिटी शोमध्ये देखील शेफाली झळकली. बूगी – वूगी, नच बलिये 5 आणि अभिनेता सलमान खान याचा वादग्रस्त शो ‘बिग बॉस’ च्या 13 सिझनमध्ये देखील अभिनेत्री दिसली. बिग बॉसमुळे शेफालीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.
शेफाली जरीवाला हिची संपत्ती
मीडिया रिपोर्टनुसार, शेफाली जरीवाला हिची एकून संपत्ती जवळपास 7 मिलियन डॉलर आहे. भारतीय चलनानुसार अभिनेत्रीकडे 7.5 कोटी रुपयांची संपत्ती होती. पण याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण शेफाली रॉयल आयुष्य जगत होती.
View this post on Instagram
शेफाली कशी करायची कमाई?
शेफाली जरीवाला ब्रँड एंडोर्समेंट, इंस्टाग्राम प्रमोशन, रिअॅलिटी शो, इव्हेंट अपिअरन्स आणि बिझनेस इन्व्हेस्टमेंटमधून भरपूर कमाई करत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेफाली एका शोसाठी लाखो रुपये घेत असे. शेफाली 35 ते 40 मिनिटांच्या परफॉर्मेंससाठी 10 ते 25 लाख रुपये मानधन घ्यायची.
कसं झालं शेफालीचं निधन?
शेफाली जरीवाला हिला हृदयविकाराचा झटका आला. पती पराग त्यागी आणि इतर तिघांनी अभिनेत्रीला मुंबईतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे डॉक्टरांनी शेफालीला मृत घोषित केलं. वयाच्या 42 व्या वर्षी शेफालीने अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही वर्षांपासून शेफाली छोट्या पडद्यावर देखील सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असायची. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करायची. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शेफालीची चर्चा सुरु आहे.
