Rise and Fall 2 Winner : भाजप सोडल्यानंतर शहजाद पूनावालाने जिंकला रियलिटी शो, लाखो रुपये जिंकत मारली बाजी

Rise and Fall 2 Winner: 'राइज अँड फॉल 2' शोचा विजेता घोषित करण्यात आला आहे. स्पर्धक शहजाद पूनावाला यांनी ट्रॉफी जिंकत मोठी बाजी मारली आहे. ट्रॉफी जिंकल्यानंतर त्यांनी सर्वांसमोर आनंद देखील व्यक्त केला.

Rise and Fall 2 Winner : भाजप सोडल्यानंतर शहजाद पूनावालाने जिंकला रियलिटी शो, लाखो रुपये जिंकत मारली बाजी
Rise and Fall 2 Winner
| Updated on: Nov 06, 2026 | 2:37 PM

Rise and Fall 2 Winner: भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून कार्यरत असलेल्या शहजाद पूनावाला यांनी पक्ष सोडल्यानंतर ‘राइज अँड फॉल 2’ मध्ये एन्ट्री केली आणि दमदार खेळीच्या जोरावर ट्रॉफी जिंकली. सांगायचं झालं तर, माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सहवाग यांच्या सूत्रसंचालनाखालील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘एमएक्स ओरिजिनल राईज अँड फॉल सीझन 2’ ला अखेर आपला नवा ‘अल्टीमेट रुलर’ मिळाला आहे. शहजाद पूनावाला यांनी ट्रॉफीवर स्वतःचं नाव नोंदवले आहे. तब्बल 15 सेलिब्रिटी स्पर्धकांना मागे टाकत शहजाद यांनी केवळ ‘राईज अँड फॉल २’ ची चमचमती ट्रॉफीच जिंकली नाही, तर 35 लाख रुपयांचं रोख बक्षीसही पटकावलं आहे. तर दुसरीकडे, या शोमध्ये टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री प्रियंका चहर चौधरी फर्स्ट रनर-अप आणि गौतम गुलाटी सेकंड रनर-अप ठरले.

ग्रँड फिनालेची संध्याकाळ स्टार-स्टडेड परफॉर्मन्स आणि इमोशनल क्षणांनी भरलेली होती. शोची सुरुवात टॉप 6 फायनलिस्ट्सच्या धमाकेदार स्टेज परफॉर्मन्स आणि एक्स-कंटेस्टेंट्ससोबत जुन्या आठवणींच्या री-युनियनने झाली. प्रसिद्ध कॉमेडियन हर्ष गुजरालने आपल्या मजेशीर शैलीने वातावरण आनंदी केले, तर फायनलिस्ट्सच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीने फिनाले खूपच भावूक बनवला. मात्र, लवकरच खेळाचं वळण बदललं आणि ‘फॉर्च्यून फ्लोर पिरामिड’ चॅलेंजमध्ये मागे पडल्यामुळे निहारिका तिवारी एलिमिनेट झाली. निहारिका बाहेर पडताच टॉवरला त्याचे टॉप 5 फायनलिस्ट मिळाले.

Loading...

स्वरा भास्कर आणि करण पटेल झाले एलिमिनेट

टॉप 5 मध्ये ट्रॉफीपर्यंत पोहोचण्याची स्पर्धा आणखी अतीतटीची झाली. यानंतर लगेचच टॉवरचे दिवे लाल रंगात बदलले, जे एलिमिनेशनचे संकेत होते. शोमध्ये मजबूत मास्टरमाइंड मानले गेलेले करण पटेल आणि आपल्या रोखठोक भूमिकेसाठी ओळखली गेलेली स्वरा भास्कर ट्रॉफीच्या रेसधून बाहेर झाले. या दोन्ही दिग्गजांच्या घराबाहेर पडण्याने ‘राईज अँड फॉल 2’ ला त्यांचे टॉप 3 फायनलिस्ट मिळाले आणि ते होते, ते स्पर्धक म्हणजे शहजाद पूनावाला, प्रियंका चहर चौधरी आणि गौतम गुलाटी.

ट्रॉफी जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करताना शहजाद पूनावाला म्हणाले, “राईज अँड फॉल सीझन 2 जिंकणं ही एक अशी भावना आहे जी मी शब्दात मांडू शकत नाही. टॉवरच्या उच्चपदांपासून ते बेसमेंटच्या अनिश्चिततेपर्यंत, हा प्रवास सोपा नव्हता. मला प्रत्येक टप्प्यावर स्वतःमध्ये बदल करावे लागले. जरी मनात कधी शंका आली, तरी मला नेहमीच विश्वास होता की मी हे करून दाखवेन. या मंचासाठी मी मेकर्स, प्राईम व्हिडिओ आणि बनिजय एशियाचा मनापासून आभारी आहे.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us