
shilpa shetty on tambdi chamdi: अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिचे डाएटचे, फिटनेसचे तसेच डान्सचे रिल तिच्या इन्टाग्राम अकाउंटवर नेहमी शेअर करत असते. कित्येकदा तिने मराठी गाण्यांवर सुद्धा तिच्या डान्सचे व्हिडीओ बनवलेले आहेत. तिच्या व्हिडीओवर चाहते नेहमी समिश्र प्रतिक्रिया देतच असतात. अशातच आता शिल्पाचा नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये शिल्पा एका ट्रेंडिंग गाण्यावर धमाल डान्स करताना दिसत आहे. शिल्पाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
‘तांबडी चामडी’वर डान्स
शिल्पाने ‘तांबडी चामडी’ या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ केला आहे. तांबडी चामडी हे गाणे खूप ट्रेंडींगमध्ये असलेलं आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं गाणं आहे. शिल्पाने या गाण्यावर व्हिडीओ करत तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. तांबडी चामडीवर डान्स करत असताना शिल्पाने अगदीच मजेशीर हावभाव दिले आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केलं आहे.
शिल्पाने तिच्या व्हिडीओवर “तांबडी चामडी आणि चेंबुर”, असे कॅप्शन दिले आहे. यामध्ये शिल्पाने सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. आणि गळ्यात सोनेरी रंगाचा नेकलेसही दिसत आहे. त्यामुळे आता शिल्पावर सर्व नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे.
नेटकऱ्यांनी केले ट्रोल
शिल्पाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “ओव्हरॲक्टिग करत आहे की झपाटलं आहे?”, तसेच दुसऱ्या एकाने प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, “बहुतेक आता गोळ्या सुरु कराव्या लागतील असं वाटतंय”,
shilpa shetty on tambdi chamdi
तर एकाने थेट “ही वेडी झाली आहे का?” असा प्रश्न विचारत खिल्ली उडवली आहे., तसेच एकाने प्रतिक्रिया देत लिहिले आहे “असं वाटत आहे की हिला भुताने झपाटलं आहे”. शिल्पाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. शिल्पाने मात्र या सगळ्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
शिल्पाबद्दल सांगायचं म्हटलं तर तिने भुवनेश्वरमधील लिंगराज मंदिरात फोटो आणि व्हिडीओ काढून मंदिराचा नियम मोडल्याचे समोर आले आहे. हे पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे. शिल्पा भुवनेश्वरमध्ये एका ज्वेलरी शोरूमच्या उद्घाटनावेळी लिंगराज मंदिराला भेट दिली. दरम्यान शिल्पाने केलेला हा डान्स व्हिडीओ देखील कार्यक्रमा दिवशीचाच आहे.